शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 11:58 IST

NCP SP Group MP Supriya Sule News: राज ठाकरे केवळ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करणार की महाविकास आघाडीतही सामील होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

NCP SP Group MP Supriya Sule News: मनसेने साद दिली आहे, त्याला प्रतिसाद कधी देणार? असा प्रश्न पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारला असता ते म्हणाले की, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. याबाबत जे काही बारकावे आहेत ते आम्ही पाहात आहोत. तुम्हाला फक्त संदेश नाही तर थेट बातमी देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये काहीही संभ्रम नाही. त्यांच्याही सैनिकांच्या मनात संभ्रम नाही. आमचे कार्यकर्ते संपर्कात आहेत. उद्धव यांच्या या विधानामुळे आता काय होते, याची उत्सुकता आहे. यातच आता राजकीय वर्तुळातूनही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मनसे-उद्धवसेना युतीबाबत भाष्य केले.

पत्रकारांशी बोलताना ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, मी त्याचे स्वागत करेन, माझ्याही मनात तेच आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र तर आनंदच आहे. कोणत्याही दोन संघटना महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील तर चांगलेच आहे. शेवटी तो त्यांचा विषय आहे. एका सशक्त लोकशाहीत कोणी कोणासोबत काम करायचे, हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार का?

राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येणार असतील, तर आम्ही का स्वागत करणार नाही? असा प्रतिप्रश्न सुप्रिया सुळे यांनी केला. यावेळी पत्रकारांनी राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार का, अशा आशयाचा प्रश्न विचारला. यावर, आता बघुया. महाष्ट्राच्या हितासाठी ते येणार असतील, तर मी अर्थातच त्याचे स्वागत करीन. एकत्र येणे हा एका सशक्त लोकशाहीमध्ये तो प्रत्येक संघटनेला अधिकार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांनी फार कष्ट करून शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली कष्टाने कार्यकर्ते आणि नेत्यांमुळे तो पक्ष बांधला. दुर्दैवाने जी गोष्ट झाली ती झाली. परंतु, आज आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन महाराष्ट्राची सेवा करणार असतील, तर ती अतिशय आनंदाची गोष्ट आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी