Ashok Kharat News: महिलांचे शोषण केल्याचा आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. अशोक खरात याने राजकीय मंडळी, प्रशासनातील बड़े अधिकारी, तसेच सेलेब्रिटी यांना जाळ्यात ओढून अमाप माया जमविली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्या ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत. यावरून राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी या प्रकरणी सोशल मीडियावर एक पोस्ट करून टीका केली आहे.
नाशिक शहर, तसेच सिन्नर येथील आलिशान बंगले, मीरगाव (ता. सिन्नर) येथे आलिशान फार्महाउस, याशिवाय अनेक जमिनी, स्वतः तसेच कुटुंबीयांच्या नावे आहेत. सोने, चांदी अन् मौल्यवान वस्तू, दोन महागड्या कार अशा एकूण तब्बल २०० कोटींच्या संपत्तीचा मालक खरात हाच असल्याचा अंदाज आहे. कुरुप विचारांचा भोंदूपणा, सगळ्या नैतिकतेचंच 'चाक' रुतवून टाकतो... हे महाराष्ट्र आज अनुभवतोय..!, असे कॅप्शन देत अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत निशाणा साधला आहे.
अमोल कोल्हे यांनी काव्यातून टीका
महिला आयोगातील जिजाऊंच्या फोटोला ताड्कन तडा गेला, जेव्हा तिथल्या खुर्चीला रांझ्याच्या पाटील पितृतुल्य झाला!
त्या खुर्चीतून बेगडी नैतिकता ओसंडून वाहिली, सामाजिक, कौटुंबिक कि वैयक्तिक सारी सीमारेषाच पुसट झाली.
काठी आधाराची होती खरी, पण स्वार्गापायी मोडून पडली, न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्येची पुन्हा एकदा शिळा झाली
सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर झुकली, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म साऱ्या साऱ्या अक्षरधनाची अक्षरश: होळी झाली…. या व्हिडिओमध्ये अमोल कोल्हे यांनी महात्मा फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथावर आधारित एक कविता सादर केली आहे. या कवितेद्वारे अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
दरम्यान, नाशिक येथील अशोक खरात याला दोन दिवसापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात पोलिसांना आता पुरावे सापडले आहेत, तसेच काही आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. न्यायालयाने अशोक खरात याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Web Summary : Amol Kolhe criticizes Rupali Chakankar's association with Ashok Kharat, accused of exploiting women. A SIT investigates Kharat's assets and connections. Kolhe's poem condemns moral decay.
Web Summary : अमोल कोल्हे ने रूपाली चाकणकर पर अशोक खरात से संबंध के लिए हमला किया, खरात पर महिलाओं के शोषण का आरोप है। एसआईटी खरात की संपत्ति और संबंधों की जांच कर रही है। कोल्हे ने कविता से नैतिक पतन की निंदा की।