शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

NCP Sharad Pawar : "अजित पवारांवर कोणताही अन्याय झालेला नाही, पक्षात निर्णय..," जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 15:25 IST

प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

राष्ट्रवादीच्या २५ व्या वर्धापनदिनावेळी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. ही घोषणा पवारांनी अजित पवार व्यासपीठावर असतानाच करण्यात आलीय. कार्यक्रमानंतर अजित पवारदेखील माध्यमांशी न बोलता तातडीनं निघून गेले. दरम्यान, यावर राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केलं.

"नव्या जबाबदारीसह नवी टीम काम करण्यास तयार आहे. आम्ही सर्व एकसंघ आहोत. अजित पवार महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांना आणखी राज्यांच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत, अन्य लोकांनाही जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी पक्षाचा विस्तार, व्यवस्था यासाठी काय करावं लागेल हे काम त्यांच्याकडे सोपवण्यात आलंय," असं जयंत पाटील म्हणाले. 

"महाराष्ट्रात अजित पवार आणि आम्ही पक्ष वाढवण्याचंच काम करत आहोत. महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. परंतु अन्य राज्यांमध्ये ती कमी आहे. जी जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आलीये, ते निरनिराळ्या राज्यात जाऊन पक्षाचा विस्तार करण्याचं काम करतील," असंही त्यांनी सष्ट केलं. "जेव्हा बैठक संपली त्यानंतर त्या ठिकाणाहून उठायलाच हवं ना. सर्व जण उठल्यानंतर ते त्या ठिकाणी बसून राहतील असं अपेक्षा करता का? अजित पवारांवर कोणताही अन्याय झालेला नाही. जे काही निर्णय घेतले जातात ते विचारपूर्वकच घेतले जातात," असंही ते म्हणाले.कार्यकारी अध्यक्षांची नियुक्तीराष्ट्रवादीचा २५  वा वर्धापन दिन शनिवारी साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना संबोधित करताना पवार यांनी मोठी घोषणा केली. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष पद देण्यात आले. शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांची जागा कोण घेणार यावरून चर्चा रंगली होती. कार्यकर्ते, नेत्यांच्या आग्रहानंतर पवार यांनी हा निर्णय बदलला होता. परंतु आता त्यांनी एकप्रकारे आपल्या उत्तराधिकाऱ्यांचीच घोषणा केली आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेJayant Patilजयंत पाटील