शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

करेक्ट कार्यक्रम होणार, BJPलाच खिंडार पडणार? NCP फुटीनंतर शरद पवार इन अ‍ॅक्शन मोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 18:58 IST

NCP Sharad Pawar Vs BJP: अजित पवार गट आणि भाजपला धडा शिकवण्यासाठी शरद पवारांनी विशेष रणनीति तयार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

NCP Sharad Pawar Vs BJP: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मोठी बंडखोरी करत थेट सत्तेत सहभागी झाले. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला नोटीस पाठवली आहे. यानंतर आता शरद पवार इन अ‍ॅक्शन मोडवर आले असून, पक्ष बांधणीवर भर दिला जात आहे. शरद पवार यांनी काही प्लॅन आखले असून, यामुळे कदाचित भाजपलाच खिंडार पडू शकते, असा कयास बांधला जात आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांनी भाजपसोबत हातमिळवणी करण्यासाठी अजित पवार गटाकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला आहे. यानंतर आता शरद पवारांनी पुन्हा ताकदीने उभे राहण्याचा निर्णय घेतला असून, राज्यभर दौरेही सुरू केले आहेत. अजित पवार गटाला आणि भाजपला धडा शिकवण्यासाठी शरद पवारांनी तयारीला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. 

कार्यकर्ते आणि जनता आपल्यासोबत राहील, यावर भर देणार

शरद पवार हे पक्ष बांधणीवर भर देणार आहेत. राज्यातील महत्त्वाचे जिल्हे आणि तालुक्यात शरद पवार यांच्या सभा होऊ शकतात. या भागातील जनतेशी संवाद साधला जाणार असून, ज्या भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, त्या भागात सर्वाधिक फोकस केला जाईल. नेते गेले तरी कार्यकर्ते आणि जनता आपल्यासोबत राहील, यावर सगळा भर असेल, असे सांगितले जात आहे. 

पर्यायी नेतृत्व निर्माण करणार 

राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या आमदारांनी सोडचिठ्ठी दिली त्यांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व उभे केले जाणार आहे. पक्षातील माजी आमदारांना पुन्हा सक्रिय केले जाणार आहे. त्यांना बळ दिले जाणार आहे. कदाचित त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. तसेच भाजपमधील ज्या माजी आमदारांना अडगळीत टाकण्यात आलेय, त्यांना आपल्यासोबत घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, भाजपने माजी आमदारांकडे दुर्लक्ष केले आहे. या आमदारांना राजकारणात कमबॅक करायचा आहे. पण भाजपकडे इतर पक्षांच्या नेत्यांचा ओघ वाढल्याने त्यांना कमबॅक करता येत नाहीये. त्यामुळे या नाराज आणि अस्वस्थ आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न शरद पवार यांच्याकडून केले जाऊ शकतात, असा कयास बांधला जात आहे. माजी आमदारांना फोडण्यात शरद पवार यांना यश आल्यास भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. शरद पवार यांना पुढे कसा प्रतिसाद मिळतो, भाजपला खिंडार पडू शकेल का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असल्याचे म्हटले जात आहे. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस