शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:30 IST

Shiv Sena Shinde Group: केवळ महाराष्ट्रातून नाही, तर राजस्थान, मध्य प्रदेश राज्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

Shiv Sena Shinde Group: आगामी महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातील अनेक ठिकाणांहून महायुतीतील घटक पक्षात विरोधी पक्षांचे नेते सामील होत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना विधानसभेत पराभवाचा मोठा धक्का बसला. यानंतर माजी नगरसेवक, पदाधिकारी, नेते मोठ्या प्रमाणात भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील होत आहेत. यातच पुणे, चंद्रपूर, नंदूरबार आणि धाराशिव येथील माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे सर्व पक्ष प्रवेश झाले. याबाबत एकनाथ शिंदे यांनी एक्सवर एक पोस्ट करून माहिती दिली. राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक शिवसेना पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश करत आहेत. दिलेला शब्द पाळणे आणि जनतेच्या कामांना प्राधान्य देण्याचे काम शिवसेना करत आहे. काम करणाऱ्या लोकांना शिवसेनेवर विश्वास वाटतो. त्यामुळे दररोज विविध पक्षांचे अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याच विश्वासाच्या बळावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वांनी तयारीला लागावे असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. 

अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला

पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी मुंबईत पार पडलेल्या या विशेष सोहळ्यात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. पुणे जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव सोनाली मारणे, नगरसेवक राहुल तुपेरे, शहर सरचिटणीस किरण मारणे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या मंगल पवार, गिरीष जैवळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती नगर परिषदेतील माजी उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, माजी नगरसेवक सुधीर सातपुते, प्रमोद गेडाम, अनिता गेडाम, राजू सारंगधर, चंद्रकांत खारकर, शोभा पारखी, शीतल गेडाम, प्रतिभा सोनटक्के, आशा निबांळकर आणि प्रदीप वडाळकर या ११ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. धाराशिव जिल्ह्यातील सोमनाथ गुट्टे, आप्पासाहेब बिराजदार, शंकर चव्हाण, नागनाथ कदम, इलाई शेख, शहाजी हाके यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासह राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर, विदिशा या जिल्ह्यांमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला.  

दरम्यान, करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्यामसिंह ठाकूर, उपाध्यक्ष धरमसिंह ठाकूर, राष्ट्रीय संघटक ठाकूर नेमसिंह सिसोदिया, मेवाड एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष जीवन सिंघवी यांनीही त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्यामसिंह ठाकूर यांची शिवसेना राजस्थान 'राज्य समन्वयक'पदी नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.  मध्य प्रदेशातील जबलपूरचे ठाकरे गटाचे उपराज्यप्रमुख शैलेंद्र बारी, विदिशा जिल्हाप्रमुख विजेंद्र लोधी, जबलपूर जिल्हाप्रमुख सुजित पटेल, नगरप्रमुख मुकेश सारठे, इंदोरमधील जावेद खान, अभिषेक कालरा, सुरेश गुर्जर, राजीव चतुर्वेदी यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस