शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

“SC निर्णयाची चुकीची माहिती देणे तुम्हाला शोभत नाही”; शरद पवार गटाची अजितदादांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 10:42 IST

NCP Sharad Pawar Group Vs Ajit Pawar Group News: गेल्यावेळेप्रमाणे ही पोस्ट डिलीट करू नका. जनतेला खोटी माहिती दिल्याबद्दल जाहीर माफी मागा, असे शरद पवार गटाने म्हटले आहे.

NCP Sharad Pawar Group Vs Ajit Pawar Group News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव तसेच निवडणूक चिन्ह ‘घड्याळ’ अजित पवार गटाला बहाल करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या शरद पवार गटाच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिले. या निर्णयानंतर अजित पवार गटाने एक्सवर केलेल्या एका पोस्टवरून शरद पवार गटाने चांगलाच हल्लाबोल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची चुकीची माहिती देणे तुम्हाला शोभत नाही, असा पलटवार शरद पवार गटाने केला आहे. 

शरद पवार गटाने अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत अजित पवार गटाला चांगलेच सुनावले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची मोडतोड करून जनतेला चुकीची माहिती देणे हे आपल्यासारखा स्वयंघोषित स्पष्टवक्तेपणावाल्यांना शोभत नाही…! असो, पण आता आम्हीच खरी माहिती जनतेपुढे आणतो!, असे शरद पवार गटाने म्हटले आहे. 

अटी व शर्तींचे उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की...

सर्वोच्च न्यायालयाने विशेष याचिकेवर सुनावणीदरम्यान महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात अजित पवार गटाला घड्याळ चिन्हाच्या वापराबाबत अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेतील वृत्तपत्रांव्दारे जाहीर नोटीस प्रसारित करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यामध्ये घड्याळ चिन्हासोबत, घड्याळ चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे!, असे नमूद करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात अटी व शर्तींचे उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले आहे की, बॅनर्स, पोस्टर्स, व्हिडीओ किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी जिथे जिथे घड्याळ चिन्हाचा वापर करण्यात येईल त्या त्या ठिकाणी घड्याळ चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे!, असे नमूद करावे. असा खणखणीत निर्देशच सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवार गटाला देण्यात आला आहे.  खरी माहिती लपवून खोटे सांगण्याचा खटाटोप 

परंतु आपण खोटी माहिती देऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाचाच अवमान केला आहे. खरी माहिती लपवून खोटे सांगत सर्वोच्च न्यायालयाने तुमच्यावर घातलेल्या अटी व शर्ती झाकण्याचा खटाटोप केलाच आहे तर, निर्देशांच्या अवमानाबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून होणाऱ्या संभाव्य कारवाईलाही सामोरे जा म्हणजे झाले, असे शरद पवार गटाने म्हटले आहे.

दरम्यान, आणि हो... गेल्यावेळेसच्या ट्वीटप्रमाणे हेदेखील ट्वीट डिलीट करू नका... त्यामुळे किमान आताची तरी चूक मान्य करून न्यायालयाच्या अवमानाबद्दल आणि जनतेला खोटी माहिती दिल्याबद्दल जाहीर माफी मागा, असे शरद पवार गटाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सोबत अजित पवार गटाने एक्सवर शेअर केलेला एक फोटो शेअर केला आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय