शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

“आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार”; जयंत पाटील यांनी दिली गॅरंटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 19:43 IST

Jayant Patil News: मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Jayant Patil News:मराठा आरक्षणासंदर्भातील ‘सगेसोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, मराठा-कुणबी एकच असल्याचा कायदा पारित करावा,  आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांची पूर्तता करण्यास सरकारला एक महिन्याची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले. महिनाभरात मागण्या मान्य न झाल्यास उपोषण न करता विधानसभा निवडणुकीत उतरून तुमचे उमेदवार पाडू, असा इशाराही जरांगे  यांनी दिला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी शब्द दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला चितपट केल्यानंतर महाविकास आघाडीची ताकद आणि आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचे घटक पक्षांकडून सांगितले जात आहे. पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. सरकारला मुदतवाढ दिली असली तरी, मनोज जरांगे यांनी आंदोलन सोडणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच शाहगड येथे कार्यालय सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करणार असल्याची गॅरंटी जयंत पाटील यांनी दिली आहे. 

आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकार त्यावर विचार करणार का? त्यांची मागणी प्रथम पाहावी. आमचे सरकार आले तर त्यांची मराठा आरक्षणाची मागणी पाहिली करून घेऊ, असा शब्द जयंत पाटील यांनी दिला. तसेच दोन आठवड्याचा अधिवेशन करण्याची डाव दिसत आहे. भाषण सुरुवात आणि नंतर दोन दिवस आर्थिक बजेट मांडवे, असे आहे. अधिकचा आठवडा वाढावा ही विनंती आहे. अधिकाचे दिवस वाढवावे. न्याय मागण्यासाठी दिवस मिळावे. शेवटचे अधिवेशन आहे, त्यामुळे सगळ्यांना बोलण्याची संधी मिळावी, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. ते एबीपी माझाशी बोलत होते.

दरम्यान, अण्णा हजारे बराच वेळ शांत होते. गेली अनेक वर्षे त्यांचे मौन होते.  आता बोलत आहेत, हे आश्चर्य आहे. ते आता अजित पवार यांच्यावर का बोलतात? ते त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधावे. त्या आरोपमध्ये आतापर्यंत काही मिळाले नाही. त्यांचा बोलावता धनी नक्की कोण? अशी विचारणा जयंत पाटील यांनी केली. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणNCPराष्ट्रवादी काँग्रेस