शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

कुणी सांगितलं मी म्हातारा झालोय, तुम्ही काय बघितलयं?; शरद पवारांचा मिश्किल टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 14:26 IST

जो संकटात आहे त्याचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायला हवा. अतिवृष्टीमुळे भू गर्भातील पाण्याची पातळी निदान २ वर्ष टिकेल. नुकसान झालंय त्याची भरपाई सरकारने करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं पवार म्हणाले.

पुरंदर - ज्यांच्या हातात देशाची, राज्याची सूत्रे आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या हितासाठी काही ठोस पाऊले टाकली पाहिजे ती टाकायची त्यांची तयारी नाही. निर्णय घ्यायला तयार नाहीत. १९७८ मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा खेड्यापाड्यात मोठा दुष्काळ होता. तेव्हा १५ दिवसांत मी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. माझ्याकडे केंद्राची जबाबदारी आली तेव्हा ३ महिन्यात ७२ हजार कोटींचे शेतकरी कर्ज माफ केले होते असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजपावर निशाणा साधला. 

शरद पवार म्हणाले की, गेल्या १० वर्षात भू विकास बँकेचे कर्ज शेतकऱ्यांना मिळाले आहे का? कुणी वसूलीला जात नाही. जिथे वसूली होणार नाही तिथे भू विकास बँकेचे कर्ज माफ केले अशी घोषणा राज्य सरकारने २-३ दिवसांपूर्वी केली. संकटग्रस्त शेतकऱ्यांना नियम बाजूला ठेवून माणूस म्हणून मदत करायला हवी. जो संकटात आहे त्याचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायला हवा. अतिवृष्टीमुळे भू गर्भातील पाण्याची पातळी निदान २ वर्ष टिकेल. नुकसान झालंय त्याची भरपाई सरकारने करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वेळ पडल्यास संघर्ष करू. मोर्चा काढायचा, मागणी करायची. जुने दिवस विसरायचे कारण नाही. पिकांचे जे नुकसान झालंय त्याची भरपाई केंद्र, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट भरावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पुरंदर येथे शेतकरी संवाद कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. 

तसेच माझ्याकडे केंद्राची जबाबदारी होती. तेव्हा मी फळबाग योजना काढली. तेव्हा शेतकऱ्यांना मोठे आर्थिक सहाय्य केले. आंबे, काजू कोकणात हजारो शेतकरी उत्पादन घेतात. कोकणातला शेतकरी १६-१८ वय झाले तर मुंबईकडे कामाला जायचे. ६० वय झाल्यानंतर गावाकडे परतायचे. शेती फारसी नव्हती. आज मुंबईला जाण्याची भूमिका कोकणच्या लोकांची नाही. फळबाग योजनेचा फायदा घेत काजू, आंबा, फणस उत्पादन कसं घेता येईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. सरकारच्या योजना शेतकऱ्यांच्या पदरात कशा पडतील यासाठी प्रयत्न करू असंही शरद पवार म्हणाले. 

मी म्हातारा झालोय का?मी आता बाहेर फिरू नये असं एकानं सांगितले. पण कुणी सांगितले मी म्हातारा झालो, तुम्ही काय बघितलंय? मी म्हातारा झालो नाही. वय वाढते. प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याची भूमिका आमची आहे. १९८४ ला मी लोकसभेला पहिल्यांदा उभा होतो तेव्हापासून सुप्रिया सुळे, अजित दादा, संजय जगतापांची निवडणूक असेल प्रत्येक वेळी सासवडच्या लोकांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे असं शरद पवारांनी म्हटलं. 

सन्मानाने जगण्याची भूमिका तालुक्याने घेतली सोमेश्वर कारखाना सर्वात जास्त भाव ऊसाला देतो. १६ लाख टन ऊस गाळप केला जातो. रोजगार हमी काम सुरू करा, दुष्काळाचं काम सुरू करा अशा मागण्या होत होत्या. आता दिवस बदलले. कारखाने हवेत अशी मागणी होतेय. काहीजण काम करण्यापेक्षा प्रश्न उपस्थित करायचं काम करतात. महाराष्ट्राच्या कुठल्याही एसटी स्टँडवर गेलो तरी कानिफनाथ रसवंती गृह दिसायचं. गाव कुठलं तर पुरंदर, या भागातील लोकांनी ते ताब्यात घेतले होते. दिवेघाटातून खाली उतरल्यावर अमृततुल्य चहा हेदेखील पुरंदर तालुक्यातून पुढे आले. सन्मानाने जगण्याची भूमिका या तालुक्यातील लोकांनी घेतली असं पवार म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा