शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

Rupali Patil : "चित्राताई संजय राठोडांना राखी बांधायला जाणार; तुमचा लढा खोटा, तुम्ही कधीच जिंकू शकत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 17:12 IST

NCP Rupali Patil Slams BJP And Chitra Wagh : रुपाली पाटील यांनी "बेकायदेशीर सरकारने आज अखेर मंत्रिमंडळाची शपथ घेतली आहे. रखडलेला पाळणा आज हलला" असे म्हणत राज्य सरकारवर टीका केली आहे.

मुंबई - शिवसेना नेते आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे ते आता फडणवीस आणि चंदकांत पाटील यांच्यासोबत मंत्रीमंडळात दिसणार आहे. ज्या भाजपने त्यांच्या राजीनाम्यासाठी राळ उठवली होती, आंदोलने केली होती तेच आता भाजपसोबत मंत्री असणार आहेत. त्यामुळे, भाजपाची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (NCP Rupali Patil) यांनी भाजपा आणि भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्यांना भाजपात घेऊन गंगेत धुतलं, पवित्र केलं" असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. 

रुपाली पाटील यांनी "बेकायदेशीर सरकारने आज अखेर मंत्रिमंडळाची शपथ घेतली आहे. रखडलेला पाळणा आज हलला" असे म्हणत राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच चित्राताई आता संजय राठोड यांना राखी बांधायला बंगल्यावर जाणार आहेत असं म्हणत हल्लाबोल केला आहे. "भाजपा केवळ महिला सन्मानाचा दिखावा करते. मात्र यानिमित्ताने भाजपा आणि शिंदे-फडणवीसांचा चेहरा महाराष्ट्राच्या समोर आला आहे. आज शपथविधी झालेल्या निम्म्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप याच भाजपाने केले होते. पण त्यांना भाजपामध्ये घेऊन गंगेमध्ये धुतले आणि पवित्र केले. भाजपा सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊ स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेत आहे, हेच दिसून येते" असं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे. 

"भाजपाच्या चित्रा वाघ, देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या अक्षरश: ओरडून ओरडून सांगत होते, की संजय राठोड यांनी बलात्कार केला आहे. आता त्याच संजय राठोड यांना भाजपाने पवित्र करून घेतले आहे. चित्राताई आता संजय राठोड यांना राखी बांधायला बंगल्यावर जाणार आहेत. चित्रा वाघ म्हणत आहेत, की लढेंगे और जितेंगे… चित्राताई तुमचा लढा ही खोटा आणि तुम्ही आयुष्यात कधीच जिंकू शकत नाही" असं म्हणत रुपाली पाटील यांनी बोचरी टीका केली आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"एका संजयने मविआ सरकार बुडवले आता मंत्रिमंडळातील हा संजय या सरकारचं जहाज बुडवेल"

संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिल्याने यावरून अनेकांनी नव्या सरकारवर निशाणा साधला आहे. राठोड यांच्यावरून मनसेने ही खोचक टोला लगावला आहे. मनसेचे  प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "एक संजयने महाविकास आघाडी सरकार बुडवले आता मंत्रिमंडळातील हा संजय या सरकारचे जहाज बुडवेल असं दिसतंय... सब घोडे बारा टक्के..." असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील हल्लाबोल केला आहे.  

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघSanjay Rathodसंजय राठोडNCPराष्ट्रवादी काँग्रेसCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार