शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Rohit Pawar : "नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवं"; रोहित पवारांचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 10:57 IST

NCP Rohit Pawar : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे.

सध्या देशाचं इंग्रजीतील नाव बदलून भारत करण्याच्या मुद्द्यावरून जोरदार घमासान सुरू आहे. अनेकजण इंडियाचं नामकरण भारत करण्याच्या मुद्द्याला पाठिंबा देत आहेत. तर काही जण विरोध करत आहेत. जी-२० देशांच्या बैठकीसाठी येणाऱ्या पाहुण्यांना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. केंद्र सरकार विशेष अधिवेशनामध्ये विधेयक संमत करून घेत घटनेमधून इंडिया हा शब्द हटवेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर एका देशाचं नाव बदलण्यासाठी देशाचे किती पैसे खर्च होतील, असा प्रश्न विचारला जात आहे. राष्ट्रवादीने यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 

"नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवं" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच मूळ मुद्दे चर्चेतून बाजूला सारायचे हाच एकमेव अजेंडा हे सरकार चालवत आहे असं ही म्हटलं. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. "नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर गरिबीला श्रीमंती, बेरोजगार युवकाला नोकरीवाला, महागाईला स्वस्त, भ्रष्टाचाराला सुशासन, खराब रस्त्यांना चकाचक रस्ते, आत्महत्येला इच्छामरण, हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवं."

"देशाच्या मुलभूत समस्या सोडवण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी भावनिक राजकारण करायचे आणि देशाचे मूळ मुद्दे चर्चेतून बाजूला सारायचे हाच एकमेव अजेंडा हे सरकार चालवत आहे. त्यामुळे महागाई ,बेरोजगारी, शिक्षण, दुष्काळ या विषयांना प्राधान्य द्यावे की नाव बदलण्याच्या चर्चेला प्राधान्य द्यावं, हे आता जनतेनेच ठरवायला हवं. मीडिया व सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी मूळ मुद्द्यांना बाजूला सारण्याचा सरकारच्या या जाळ्यात न अडकता मूळ मुद्द्यांवरच चर्चा करायला हवी ही विनंती" असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

जगात सध्या १९५ हून अधिक देश आहेत. त्यामधील अनेक देशांनी कुठल्या ना कुठल्या कारणाने आपलं नाव बदललेलं आहे. त्यामुळे आपलं नाव बदलणारा भारत हा पहिला देश नसेल. मात्र केवळ नाव बदलल्याने बोलण्या  लिहिण्यापुरतं नाव बदलणार नाही. तर कागदपत्रे, संकेतस्थळे, लष्करी गणवेश एवढंच नाही तर लायसन्स प्लेटवरही हा बदल दिसणार आहे. हे सर्व बऱ्यापैकी खर्चिक असू शकतं. देशाचं नाव बदलण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, याचा अंदाज घेण्यासाठी कुठलाही फिक्स फॉर्म्युला नाही आहे.  

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणIndiaभारत