शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Rohit Pawar : "सरकारला गुंडांचा विळखा आणि सरकार कुणासाठी हे ओळखा? असं म्हणायची वेळ आलीय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 10:42 IST

Rohit Pawar : रोहित पवार यांनी राज्यातील सरकारवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. असं असतानाच आता जळगावच्या चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर तीन अज्ञात युवकांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. 

रोहित पवार यांनी या अशा घटनांवरून राज्यातील सरकारवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "हे सगळं पाहिल्यावर ‘सरकारला गुंडांचा विळखा आणि सरकार कुणासाठी हे ओळखा?’ असं म्हणायची वेळ आलीय..." असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "गृहमंत्री महोदय राज्यातील जनतेला आपल्या मागदर्शनाखाली अजून काय काय पाहावं लागणार आहे?" असा खोचक सवाल देखील विचारला आहे. 

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रोहित पवार यांनी याबाबत ट्विट करून टीकास्त्र सोडलं आहे. "गुंडच सरकारसोबत फोटोसेशन करतात, मंत्रालयात रिल्स बनवतात, भाजपाचे आमदार पोलीस ठाण्यात गोळ्या घालतात आणि आता भाजपाच्या नगरसेवकावर गोळ्या झाडल्या… हे सगळं पाहिल्यावर ‘सरकारला गुंडांचा विळखा आणि सरकार कुणासाठी हे ओळखा?’ असं म्हणायची वेळ आलीय..गृहमंत्री महोदय राज्यातील जनतेला आपल्या मागदर्शनाखाली अजून काय काय पाहावं लागणार आहे?" असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर गोळीबार

चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर  तीन  अज्ञात युवकांनी गोळीबार केला. यात ते जबर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराच्या या घटनेमुळे शहर हादरले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजता घडली.  महेंद्र मोरे हे हनुमानवाडीतील आपल्या कार्यालयात बसलेले असताना सायंकाळी पावणेपाच वाजता तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCrime Newsगुन्हेगारी