शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: भाजपमधील कोणता नेता सर्वात जास्त आवडतो?; रोहित पवारांनी दोनच शब्दांत दिले स्पष्ट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 09:39 IST

Maharashtra News: कोणते मंत्रिपद भूषवायला आवडेल? असा प्रश्नही विचारण्यात आला होता. याला रोहित पवारांनी सूचक शब्दांत उत्तर दिले.

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण अनेकविध मुद्द्यांवरून तापलेले पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या अयोध्या दौऱ्यावरून ठाकरे गटासह महाविकास आघाडीचे नेते सडकून टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार हेदेखील सातत्याने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत असतात. यातच रोहित पवार यांना कोणता भाजप नेता आवडतो असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. 

रोहित पवार यांनी #AskRohitPawar या हॅशटॅगने नेटिझन्सला कोणतेही प्रश्न विचारायचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नेटिझन्सकडून भन्नाट प्रश्न विचारण्यात आले. रोहित पवार यांनीही दिलखुलास उत्तरे दिली. एका युझरने विलासराव देशमुखांविषयी दोन शब्द सांगण्याचे ट्विट केल्यावर रोहित पवारांनी त्याला ‘निष्ठा आणि कर्तृत्व’ असे उत्तर दिले. तर एका युझरने आजोबा शरद पवारांकडून तुम्हाला काय शिकायला मिळाले? असा प्रश्न विचारला. त्यावर रोहित पवार यांनी उत्तर देताना ‘गरम वातावरणात डोके कसे शांत ठेवले पाहिजे’, असे उत्तर दिले.  रोहित पवारांना भाजपामधला कोणता नेता आवडतो? 

रोहित पवारांना भाजपामधला कोणता नेता आवडतो? असा प्रश्न एका ट्विटर युझरने केला. यावर विरोधी पक्षातल्या नेत्याविषयी बोलताना कोणताही आढावेढा न घेता रोहित पवारांनी ‘गडकरी साहेब’ असे दोन शब्दांत उत्तर देत नितीन गडकरी यांचे नाव घेतले. तसेच कोणते मंत्रिपद भूषवायला आवडेल? असा प्रश्न एका युझरने रोहित पवार यांना विचारला असता त्यावर ‘पद महत्त्वाचे नसले, तरी जिथे युवांच्या हाताला काम देता येईल, असे मंत्रिपद नक्कीच आवडेल’, असे सूचक उत्तर रोहित पवार यांनी दिले. 

दरम्यान, एका युवतीने तर आपले एका तरुणावर प्रेम असून घरचे लग्नाला तयार नाहीत, तर दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतलाय, तुमच्या मते मी काय करायला हवे? असा प्रश्न विचारला असता ‘पळून जाण्यासाठी आई-वडिलांनी सहमती दिली असेल तर ते म्हणतात तसे नक्की करा!’ असा सल्ला रोहित पवार यांनी दिला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस