शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

विधानसभेलाही अशोक चव्हाणांना रोखण्यासाठी भाजपची व्यूहरचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 15:11 IST

राष्ट्रवादीचे बापूसाहेब गोरठेकर यांना भाजपमध्ये घेऊन चव्हाणा यांच्याविरुद्ध तगडा उमेदवार देण्याचा डाव भाजपकडून आखला जात असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई - भाजप-शिवसेनेने फोडाफोडीचे राजकरण करत काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा पक्ष प्रवेशाचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर हे सुद्धा पक्षाला रामराम ठोकून  लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर गोरठेकर यांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध भोकर मतदारसंघातून उतरवण्याची तयारी भाजप करत असल्याची चर्चा आहे. चव्हाण यांना लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत रोखण्यासाठी भाजपकडून व्यूहरचना आखली जात असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादीचे बापूसाहेब गोरठेकर यांना भाजपमध्ये घेऊन चव्हाणा यांच्याविरुद्ध तगडा उमेदवार देण्याचा डाव भाजपकडून आखला जात असल्याचे बोलले जात आहे. गोरठेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आहेत. यापूर्वी जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्यांनी विधानसभेतही नायगाव मतदार संघाचे प्रतिनिधी म्हणून काम केले. त्यामुळे गोरठेकर यांना उमेदवारी दिली तर चव्हाण यांना विजय मिळवणे नेहमीप्रमाणे सोपे जाणार नाही. तर चव्हाण यांना आपल्या मतदारसंघातच अडवून ठेवण्याचा हा भाजपचा डाव असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.

नुकत्याच झालेल्या एका बैठकीत गोरठेकर यांनी सुद्धा अशोक चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहे. याच बरोबर त्यांनी चव्हाण यांच्यावर टीका सुद्धा केली. आपल्या राजकीय स्वार्थासाठी चव्हाणांनी जिल्ह्यातील दिग्गज राजकीय घराण्यांना घरी बसवले. येत्या काळात हा सर्व हिशोब चुकता करू, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे लोकसभाप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही चव्हाण यांच्यासमोर विरोधकांचा तगडा आव्हान असणार आहे.

लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप मंत्र्यांनी मोठ्याप्रमाणात प्रचार सभा घेतेल्या होत्या. त्यामुळे चव्हाण यांना मतदारसंघात अधिक वेळ द्यावा लागत होता. चव्हाण यांच्यावर पक्षाची राज्यस्तरीय जवाबदारी असल्याने त्यांना नांदेडमध्येच अडकवून ठेवण्याची भाजपची ही खेळी होती. त्यात भाजपला यश सुद्धा मिळाले असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना विजयासाठी नेहमीपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.