शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Amol Mitkari: "हा ड्रामा आणि हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण", अमोल मिटकरींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 19:31 IST

Amol Mitkari: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई: काल अनिल परबांविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दापोलीत आंदोलन केले. त्यानंतर आज सांगलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यावरुन गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचे आंदोलन झाले. या दोन्ही आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी टीका केली आहे. 

काल किरीट सोमय्या यांनी अनिल परबांच्या रिसॉर्टबाबत एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी शनिवारी दिवसभर दापोलीमध्ये आंदोलन केले त्यानंतर आज गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पणावरुन शरद पवारांना आव्हान दिले. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी ट्वीटरवरुन टीकास्त्र डागले. ''हाय होल्टेज ड्रामेबाजाना महाराष्ट्रातील जनता आता कंटाळली आहे. काल कोकणात तोतला व आज इकडे मंगळसुत्र चोर जो थयथयाट करत आहेत तो थयथयाट राज्यातील हुशार तरुणाई पाहते आहे. हा ड्रामा व हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण आहे. आगामी काळात ही घाण जनताच साफ करेल. #मंगळसुत्रचोर'', अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी टीका केली.

लोकार्पण झाल्याचा पडळकरांचा दावासांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरुन गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. या पुतळ्याचे लोकार्पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. त्याला पडळकर आणि खोत यांनी विरोध दर्शवला आणि दोन्ही नेते रस्त्यावर उतरले. या सर्व गोंधळात पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडल्याचा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात पडळकर यांना होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करणे शक्य नव्हते, त्यामुळे पडळकरांनी पुन्हा एकदा आपला गनिमीकावा दाखवला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करुन लोकार्पण केल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरKirit Somaiyaकिरीट सोमय्याSadabhau Khotसदाभाउ खोत NCPराष्ट्रवादी काँग्रेस