शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

...तर मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो MIDC तुमच्यामुळेच झाली; रोहित पवारांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 15:18 IST

राजकीय स्वार्थासाठी जनहिताचा बळी देणाऱ्या व्यक्तीच्या दबावापोटी लाखो लोकांच्या भविष्याशी खेळणं सरकारला शोभते का? असा खोचक सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

अहमदनगर : गेल्या काही महिन्यांपासून कर्जत-जामखेडमधील एमआयडीचा मुद्दा चर्चेत असून राजकीय कुरघोडीमुळे या एमआयडीसाला मंजुरी दिली जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून केला जात आहे. राज्य विधिमंडळाच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनातही रोहित पवारांनी हा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसंच रोहित यांनी आता सोशल मीडिया हँडलवर याबाबत एक पोस्ट लिहीत आपला संताप व्यक्त केला आहे.

"तुम्हाला एमआयडीसीचं श्रेयच हवं असेल तर मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की ही एमआयडीसी तुमच्यामुळेच झाली. पण असले रिकामे उद्योग कशाला करता? तुमच्या वैयक्तिक स्वार्थापोटी लाखो युवकांना, गोर गरीब जनतेला, पुढच्या पिढ्यांना कशात अडचणीत आणता?" असा सवाल रोहित पवार यांनी आपल्या राजकीय विरोधकांना विचारला आहे.

"फक्त एक सही तेवढी बाकी आहे" 

एमआयडीसीबाबत आपली भूमिका मांडताना रोहित पवारांनी लिहिलं आहे की, "एखाद्या भागात उद्योग व्यवसाय आल्याने त्या भागाची होणारी भरभराट मी पाहिली आहे. त्या भागातल्या सर्वसामान्यांचे उंचावणारे जीवनमान मी पाहिले आहे. ज्याप्रमाणे योग्य नियोजन करून बारामती, रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर यासारख्या अनेक भागात औद्योगिक विकास झाला, भरभराट झाली तोच विकास तीच भरभराट माझ्या भागातही व्हावी, ही माझी साधी इच्छा एक लोकप्रतिनिधी म्हणून आहे. युवा संघर्ष यात्रेत चालत असताना सुद्धा प्रत्येक भागात त्या-त्या जिल्ह्यात त्या-त्या तालुक्यात एमआयडीसी व्हाव्यात ही युवा वर्गाची मागणी समोर आली. कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी व्हावी यासाठी मी गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा करत आहे, लढत आहे. सर्व काही झालं आहे, सर्वेक्षण झालं आहे, सर्व परवानग्या मिळाल्या आहेत, फक्त एक सही तेवढी बाकी आहे. परंतु केवळ राजकीय श्रेयवादातून एमआयडीसी जाणून बुजून रोखली जात आहे," असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

शिंदे, फडणवीस, अजित पवारांना आवाहन भाजपचे विधानपरिषद आमदार राम शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल करत रोहित पवारांनी म्हटलं आहे की, "एखाद्या बिनडोक, कुठलीही दूरदृष्टी नसलेल्या आणि राजकीय स्वार्थासाठी जनहिताचा बळी देणाऱ्या व्यक्तीच्या दबावापोटी लाखो लोकांच्या भविष्याशी खेळणे सरकारला शोभते का? मा. एकनाथजी शिंदे साहेब,  मा. अजितदादा, मा. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही तर कार्यक्षम आहात. जनतेसाठी काय योग्य आहे, काय अयोग्य हे किमान तुम्हाला तरी कळायला हवे. सरकारच्या याच धोरणामुळे राज्यातून उद्योग बाहेर जात आहेत आणि नवे उद्योग यायला तयार नाहीत. BANK Assisted project च्या गुंतवणुकीत उत्तरप्रदेश ४३१८० कोटी, गुजरात ३७३१७ कोटी, ओडीसा ११८१० कोटी ही राज्य पहिल्या तीन मध्ये आहेत तर महाराष्ट्र ७९०० कोटी च्या गुंतवणुकीसह चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. हे असंच चालू राहिलं तर उद्याची पिढी तुम्हाला सुद्धा माफ करणार नाही. हे असं अधोगतीकडे नेणारे राजकारण महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. विकासाचं राजकारण करायचं की काही बिनडोक लोकांच्या राजकीय दबावाला बळी पडून अधोगतीचं राजकारण करायचं याचा विचार राज्याच्या नेतृत्वाने करायला हवा. त्यामुळं कुठलाही आकस न ठेवता आणि कोणत्याही दबावाला भीक न घालता कर्जत–जामखेडच्या १००० एकर हून मोठ्या एमआयडीसीला आपण तातडीने मंजुरी द्यावी," अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारkarjat-jamkhed-acकर्जत-जामखेडRam Shindeराम शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेस