शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

बेरोजगाराच्या मुद्यांचा राजकीय खून झालाय का? आव्हाड आक्रमक; सरकारला दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 15:34 IST

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडले.

मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सातत्याने सरकारला लक्ष्य करत आहेत. राष्ट्रवादील एक गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर आव्हाड राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. शरद पवारांची बाजू मांडताना ते वारंवार अजित पवार गटाला प्रत्युत्तर देत आहेत. अशातच आता त्यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकारने याकडे गांभीर्याने पाहिलं नाही तर बेरोजगार तरूणांनी उद्या कायदा हातात घेतला तर त्याचे फार वाईट परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला भोगावे लागतील, असा गंभीर इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. 

सोशल मीडियावर एक पोस्ट करत आव्हाड यांनी शिंदे सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, राज्याच्या रोजगार आणि उद्योजकता विभागाकडील नोंदीनुसार राज्यात ६२ लाखांहून अधिक अधिकृत बेरोजगार आहेत. विशेष म्हणजे बेरोजगारीचे हे प्रमाण शासन दरबारी नोंद केलेल्यांचं आहे. याचा अर्थ नोंदणी नसलेल्या बेरोजगारांची संख्या दुप्पट असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात तब्बल ४ लाख बेरोजगारांची नोंद आहे.  केसरकरांवर हल्लाबोलतसेच अलीकडेच एका पात्र शिक्षिक उमेदवार तरूणीने शिक्षणमंत्र्यांना शिक्षक भरतीविषयी सार्वजनिकपणे प्रश्न विचारल्यानंतर राज्याचे शिक्षण मंत्री प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर म्हणाले की, "तुझं नाव शोधून काढून तुला अपात्र ठरवू." म्हणजे बेरोजगार तरूण-तरूणींना जाहीरपणे धमकी देण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती, अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा समाचार घेतला.

जितेंद्र आव्हाड यांनी आणखी सांगितले की, अवकाळी पावसाने ग्रामीण भागातील शेतकरी देशोधडीला लागलाय. मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी शिकणाऱ्या त्यांच्या मुलांकडे खानावळीचं बिल भरण्यासाठीचे पैसे नाहीत. पण सरकार सुशेगात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजकीय टीका तावातावाने करतात. पण बेरोजगारीच्या मुद्यावर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही. दुष्काळ, बेरोजगारी, महागाई या समस्या फक्त वर्तमानपत्रांच्या हेडलाईन होतायत. सरकारने याकडे गांभीर्याने पाहिलं नाही तर बेरोजगार तरूणांनी उद्या कायदा हातात घेतला तर त्याचे फार वाईट परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला भोगावे लागतील.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसUnemploymentबेरोजगारीMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदे