शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

"स्त्रीच्या भांगेत सिंदूर नसेल तर समजा प्लॉट रिकामा", धीरेंद्र शास्त्रींच्या विधानावरून आव्हाड संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 13:58 IST

धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Bageshwar Dham : बागेश्वर धाम येथील मठाधिपती धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर महाराज (Bageshwar Maharaj) आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. नेहमी वादाच्या केंद्रस्थानी असलेले धीरेंद्र शास्त्री आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

"एखादी महिला विवाहित असेल, तर तिच्या दोन ओळखी असतात, भांगेत कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र. मात्र, भांगेत कुंकू नसेल आणि गळ्यात मंगळसूत्र नसेल, तर आम्ही लोक काय समजतो, की हा प्लॉट अजून रिकामा आहे", असे धीरेंद्र शास्त्री यांनी प्रवचन देताना म्हणताच वादाला तोंड फुटले. यावरून माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून संताप व्यक्त केला.

शास्त्रींच्या विधानावरून आव्हाड संतापले धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानाचा समाचार घेताना जितेंद्र आव्हाडांनी म्हटले, "तो धीरेंद्र शास्त्री नावाचा बाबा म्हणतो "स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत सिंदूर नसेल तर समजावं की हा 'प्लॉट' अजून रिकामा आहे." असलं घृणास्पद बोलणाऱ्यांची लोक भक्ती करतात? पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र आणि कुंकू न लावणाऱ्या असंख्य दुर्दैवी भगिनी आपल्या समाजात आहेत. धीरेंद्रच्या मते ते 'रिकामे प्लॉट' असावे."

धीरेंद्र शास्त्रींनी आणखी सांगितले की, आपण एखाद्या महिलेकडे पाहिले अन् भांगेत कुंकू असेल, गळ्यात मंगळसूत्र असेल, तर आम्ही लोक दूरूनच पाहून समजून घेतो की, रडिस्ट्री झाली आहे. विशेष बाब म्हणजे या प्रवचनाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. व्हिडीओत दिसत आहे की, प्रवचन ऐकणाऱ्या अनेक महिला टाळ्या वाजवून त्यांच्या विधानाला प्रतिसाद देत आहेत. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक महिला यावर संताप व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडbageshwar dhamबागेश्वर धामNCPराष्ट्रवादी काँग्रेसWomenमहिला