शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

'त्या' विधानावरून रोहित पवारांची राम कदमांवर टीका; म्हणाले, "आता पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर..."

By जयदीप दाभोळकर | Updated: January 12, 2021 18:30 IST

राम कदमांनी मारहाण झालेल्या पोलिसाला फोन केल्याचं प्रकार आला होता उघडकीस

ठळक मुद्देराम कदमांनी पोलीस कर्मचाऱ्याला फोन केल्याचं झालं होतं उघडभाजपाची विचारसरणी कशी आहे हे समजत असल्याचं रोहित पवारांचं वक्तव्य

पवई पोलिसांच्या एका कॉन्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. आरोपी हे आमदार राम कदम यांचे कार्यकर्ते असून त्यांना वाचविण्यासाठी राम कदम यांनी मारहाण झालेल्या पोलिसाला फोन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी राम कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे."मुंबई पोलिसांना माफिया म्हणणाऱ्यांच्या बाजूने भाजपाच्या नेत्यांनी यापूर्वी आंदोलन केलं. आता मुंबई पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कारवाई करू नका, म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. यावरुनच यांची विचारसरणी कशी आहे, हे लोकांना समजतंय. यापलीकडं आपण काय बोलणार?," असं म्हणता रोहित पवार यांनी राम कदम यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्वीट करत कदम यांच्यावर टीका केली. काय आहे प्रकरण ?नितीन खैरमोडे असं मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. खैरमोडे यांनी भाजपाच्या सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या तिघांना वाचविण्यासाठी राम कदम यांनी खैरमोडे यांना फोन केला. राम कदम आणि खैरमोडे यांच्यात झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. "तुम्हाला झालेल्या मारहाणीचं मी समर्थन करत नाही. पण मानवतेच्या दृष्टीकोनातून आणि त्या तिघांच्या भविष्याचा विचार करा. त्या तिघांच्या करिअरचा प्रश्न आहे. त्यांचं लग्नही झालेलं नाही", असं सांगत राम कदम यांनी खैरमोडे यांच्याकडे तक्रार मागे घेण्याची मागणी केली. दरम्यान, कॉन्स्टेबल खैरमोडे यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतीमेचा प्रश्न असून असं करणं योग्य ठरणार नाही, असं ठामपणे सांगून राम कदम यांच्या मागणीला स्पष्ट नकार दिला.पवईच्या हिरानंदानी येथे गॅलरिया मॉलजवळ एका ज्येष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीवरुन येत धडक दिली होती. नियमांचं उल्लंघन करत हे भाजपाचे कार्यकर्ते ट्रिपल सीट प्रवास करत होते. यावेळी घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे दाखल झाले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतलं. त्यानंतर रिक्षाने नेत असताना कार्यकर्त्यांनी रिक्षातच खैरमोडे यांना जबर मारहाण केली. त्यांच्या चेहऱ्यावर हातात घातलेल्या कड्याने वार केले. मारहाणीत खैरमोडे रक्तबंबाळ झाले होते.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारRam Kadamराम कदमBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiमुंबईMumbaiमुंबई