शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पश्चिम बंगालमध्ये भाजपला दोन आकडी संख्येवर समाधान मानावे लागेल: नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 18:46 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Elections 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर प्रचाराला आता वेग आला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला दोन आकडी संख्येवर समाधान मानावे लागेल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.

ठळक मुद्देनवाब मलिक यांचा निवडणुकांसंदर्भात दावानवाब मलिक यांची भाजपवर टीकाभाजपकडून केवळ वातावरण निर्मिती केली जात आहे - नवाब मलिक

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Elections 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर प्रचाराला आता वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बंगालमध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकले असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात पदयात्रा काढली आहे. या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला लागले असून, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये भाजपला दोन आकडी संख्येवर समाधान मानावे लागेल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. (ncp leader nawab malik claimed that bjp cannot go beyond double digit in west bengal assembly election 2021)

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व तृणमूल काँग्रेसने या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसत आहे. तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे प्रमाण वाढले आहे. तशातच सुप्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनीही तृणमूल काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकूणच परिस्थिती पाहता पश्चिम बंगालमध्ये भाजपला तीन आकडी संख्या गाठता येणार नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 

भाजपला जास्त जागा मिळू शकत नाही

अन्य राज्यांच्या निवडणुकीत ज्या प्रकारे भाजप सरकार सत्ता, पैसा आणि बळाचा वापर करत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार येणार आहे, असे वातावरण निर्माण केले जात आहे, असे सांगत बंगालमध्ये दोन आकडी संख्येपेक्षा भाजपला जास्त जागा मिळू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला. तसेच आसामध्ये देखील भाजप सत्तेतून बाहेर होणार आहे. निकालानंतर ५० ची संख्या राहील. मग अमित शाह यांनी कन्याकुमारीचा किंवा पंतप्रधान मोदींनी आसाम, बंगालचा दौरा केला तरी काही फरक पडणार नाही, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.

नाणार प्रकल्पावर मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, शिवसेना स्थानिकांसोबत: उदय सामंत

भाजप सत्तेत आल्यानंतर देशात जातीयद्वेषाचे विष वाढत आहे

रांची येथील हरमू मैदानात आयोजित केलेल्या एका सभेत शरद पवार बोलत होते. बंधूभाव प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी आहे, परंतु भाजपा देशात जातीयद्वेषाचं विष  पसरवत आहे. गेल्या १०० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. पंतप्रधानांना कोलकाता येथे जाण्यास, पश्चिम बंगाल सरकारविरोधात रॅली काढण्यास वेळ आहे. परंतु, दिल्लीतील शेतकऱ्यांना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही, या शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. 

टॅग्स :ElectionनिवडणूकWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१NCPराष्ट्रवादी काँग्रेसnawab malikनवाब मलिकBJPभाजपाPoliticsराजकारण