"तिथे मॅप बदलले जात आहेत, आपण इथे ॲप वर बंदी घालतोय, काय पोरकटपणा आहे!"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 11:25 AM2020-07-01T11:25:13+5:302020-07-01T11:42:19+5:30

नरेंद्र मोदी सरकारनं 59 चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे...

NCP leader Jitendra Awhad criticize pm narendra modi government on 59 china app ban | "तिथे मॅप बदलले जात आहेत, आपण इथे ॲप वर बंदी घालतोय, काय पोरकटपणा आहे!"

"तिथे मॅप बदलले जात आहेत, आपण इथे ॲप वर बंदी घालतोय, काय पोरकटपणा आहे!"

Next

भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडता यांना धोका ठरू शकणाऱ्या ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी रात्री जाहीर केला. भारताच्या भूमीवर डोळे वटारून पाहणाऱ्या चीनशी समर्थपणे दोन हात करत असतानाच हा निर्णय घेऊन सीमांचे बंधन नसलेल्या सायबर विश्वातही या कपटी शेजारी देशाविरुद्ध भारताने एक प्रकारे युद्धाचे बिगुल फुंकले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. 

'तिथे मॅप बदलले जात आहेत, आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय. काय पोरकटपणा आहे! कारण आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य आहोत आणि आपण स्वाक्षरी केलेल्या कराराच्या कलम २ आणि १४ (सी) - २ या कलमांनुसार ही बंदी शक्य आहे का ? कशाला ही धूळफेक?,' असे आव्हाड यांनी ट्विट केलं.

ही अ‍ॅप वापरू नका!
टिकटॉक, शेअरइट, किवी, यूसी ब्राऊझर, बायडू मॅप, शेइन, क्लॅश ऑफ किंग्स, डीयू बॅटरी सेव्हर, हॅलो, लायकी, यूकॅम मेकअप, मी कम्युनिटी, सीएम ब्राऊझर्स, व्हायरस क्लिनर, एपीयूएस ब्राऊझर, रोमवुई, क्लब फॅक्टरी, न्यूजडॉग, वुईचॅट, यूसी न्यूज, क्यूक्यू मेल, वेईबो, झेंडर, क्यूक्यू म्युझिक, क्यूक्यू न्यूजफिड, बिगो लाइव्ह, सेल्फीसिटी, मेल मास्टर, पॅरलल स्पेस, माय व्हिडिओकॉल झिओमी,
वुई सिंक, ईएस फाईल एक्प्लोरर, ब्युटीप्लस, व्हिवा व्हिडिओ क्यूयू व्हिडिओ इंक, मीटू, व्हिगो व्हिडिओ, न्यू व्हिडिओ स्टेटस, डीयू रेकॉर्डर, व्हॉल्ट हाईड, कॅचे क्लीनर डीयू अ‍ॅप स्टुडिओ,डीयू क्लीनर, डीयू ब्राऊझर, हॅगो प्ले विथ न्यू फ्रेन्डस, कॅम स्कॅनर, क्लीन मास्टर चिताह मोबाईल, वंडर कॅमेरा, फोटो वंडर, क्यू क्यू प्लेअर, वुई मीट, स्वीट सेल्फी, बैदू ट्रान्सलेट, वीमेट, क्यू क्यू इंटरनॅशनल, क्यू क्यू सेक्युरिटी सेंटर, क्यू क्यू लॉन्चर, यू व्हिडिओ, व्ही प्लाय स्टेटस व्हिडिओ, मोबाईल लेजंड््स आणि डीयू प्रायव्हसी.

लोकेश राहुलसाठी पुन्हा एकदा 'कॉफी' डोकेदुखी ठरली; विराट कोहलीनंही फिरकी घेतली

कब्रस्तानमध्ये सराव करायचा टीम इंडियाचा 'हा' शिलेदार; सौरव गांगुलीनं बदललं आयुष्य!

Read in English

Web Title: NCP leader Jitendra Awhad criticize pm narendra modi government on 59 china app ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.