शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तर मी अजित पवारांचा धिक्कार करतो! बिर्ला देशद्रोही...! हे काय बोलून गेले आव्हाड? वाद पेटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 15:06 IST

आव्हाड विधानभवनाबाहेर बोलत होते. त्यांच्या या विधानावरून आत पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही...

सध्या राज्याचे पावसाळी अधिवेश सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतील श्लोकांच्या मुद्द्यावरून अजित पवार आणि संविधानाच्या मुद्द्यावरून लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासंदर्भात भाष्य केले आहे. "मनुस्मृतीतील चार श्लोक विचाराधीन होते, असे अजित पवार म्हणत असतील, तर मी त्यांचा धिक्कार करतो." तसेच, "संविधानाचे नाव घेऊ नका, असे म्हणणारा, या देशाचा देशद्रोही आहे... बिर्ला देशद्रोही आहेत!" असे आव्हाड यांनी म्हटले आहे. ते विधानभवनाबाहेर बोलत होते. त्यांच्या या विधानावरून आत पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवार म्हणाले असतील तर -यावेळी, मनुस्मृतीसंदर्भात अजित पवारांनी म्हटले आहे की, मनुस्मृतीतील चार श्लोक आम्ही घेतले नाही. विचाराधीन असताना सातत्याने टीका केली जात आहे? असे विचारले असता आव्हाड म्हणाले, विचाराधीन... कोण म्हणालं हे? अजित पवार म्हणाले असतील तर मी त्यांचा धिक्कार करतो. तुम्ही मनुस्मृतीचा विचार तरी कसा करू शकता? दुर्दैव आहे. आता नाही म्हणताहेत, कारण हे महाराष्ट्रभर गेले आहे. तुम्ही संविधान बदलणार होतात, नंतर तुम्हाला भूमिका बदलावी लागली. कारण संपूर्ण देशभरातून विरोध व्हायरला लागला. आता मनुस्मृती संदर्भात स्वतः अजित पवार म्हणणार असतील की, विचाराधीन होतं, तर मी अजित पवारांचाच धिक्कार करतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

बिरला देशद्रोही - आव्हाड :संसदेच्या अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर, जय संविधान, अशी घोषणा दिली होती. यानंतर थरूर सभापती ओम बिर्ला यांच्यासोबत हस्तांदोलन करून आपल्या जागेवर परतत होते. तेवढ्यात सभापतींनी त्यांना हटकले आणि म्हणाले, संविधानाची शपथ तर घेतच आहात, ही संविधानाचीच शपथ आहे. यासंदर्भात विचारले असतता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे नेते जितेंद्र आव्हा म्हणाले, "हेच बघा, त्यांना संविधानाबद्दल किती राग आहे? ते पार्लमेंट चालतं संविधानानुसार, ते जे पद आहे, ते संविधानातून निर्माण झाले आहे आणि संविधानाचे नाव घेऊ नका असे म्हणणारा, या देशाचा देशद्रोही आहे... बिर्ला देशद्रोही आहेत! असे आव्हाड म्हणाले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAjit Pawarअजित पवारom birlaओम बिर्लाNCPराष्ट्रवादी काँग्रेस