शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

"मग तुरूंगात चक्की पिसिंग पिसिंग अँड पिसिंग..."; ‘अजितदादां’ची बारामतीत जोरदार फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 17:46 IST

विरोधकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलेली फटकेबाजी हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली.

ठळक मुद्देपवार कुटुंबीयांवर बारामतीकरांचं जीवापाड प्रेम, करावी तेवढी कामं कमी, पवार यांचं वक्तव्य

बारामती : मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रमात उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. रविवारी (दि३१) दिवसभर बारामतीत पवार यांनी विरोधकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलेली फटकेबाजी हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली. बारामती येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली."व्यवसाय निवडताना अवैध उद्योग करण्याचे पाप कोणी करणार नाही याची खात्री बाळगतो. या योजनेचा लाभ घेताना मध्यस्थ, दलालाची गरज नाही. काहीजण माझ्याबरोबर फोटो काढत कालच दादांना भेटुन आलोय, चल तुझ काम करतो असे सांगतात. हे प्रकार चालणार नाहीत. पैशाची मागणी केल्यास पोलीसांकडे तक्रार करा, मला सांगा. मी बघतो काय करायचे त्यांचे. कार्यकर्त्यांनी कोणाकडूनही पैसे मागू नये. अन्यथा जेलमध्ये जावे लागेल. त्यानंतर मग जेलमध्ये चक्की पिसिंग पिसिंग अ‍ॅण्ड पिसिंग करावे लागेल," असं मिश्किल वक्तव्य अजित पवार यांनी यावेळी केलं.यावेळी पवार यांनी भल्या पहाटेच काम करण्याच्या पद्धतीबाबत भाष्य केलं. "पवार कुटुंबीयांवर बारामतीकर जीवापाड प्रेम करत असल्याने जेवढी कामे करावी तेवढी कमीच वाटतात. विकासकामे जागेवर जाऊन पहावी लागतात. त्यासाठी थोड उजाडल्यावर दिसण्याची वाट पहावी लागते. अन्यथा मी रात्रीही काम केल असतं," असं पवार यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.कामाच्या दर्जाबाबत अजित पवार आग्रही असतात. आज देखील पवार यांनी बारामती येथील निरा डावा कालव्यावर काम न आवडल्याने संबंधितांना चांगलच झापल्याचे यावेळी कार्यक्रमात सांगितले. जनतेचा पैसा आहे, त्याचा योग्य वापर झाला पाहिजे असं म्हणत निरा डावा कालव्याच्या कामाला विरोध करणाऱ्या विरोधकांना पवार यांनी चिमटे काढले.पवार म्हणाले. "शहरात मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र, कालव्याच्या काँक्रिटीकरणामुळे अनेकांचे पाणी जाईल अशी ओरड काही करीत आहेत. हा केवळ विरोधासाठी विरोध आहे. कारण नसताना, चांगल चाललेलं असताना काम काहीजण उगाच काही गोष्टी करत आहेत. ही जित्रब वाईट आहेत. बारामतीकर यांचा विचार करीत नाहीत ही गोष्ट खरी आहे. बाहेरचा कोणी आला तर त्याचे डिपॉझिट जप्त करुनच त्याला पाठवतात, असे बारामतीकरांचे काम आहे. त्यामुळे बारामतीकरांसाठी आणखी काम करण्याची इच्छा निर्माण होते," असंही त्यांनी नमूद केलं. 

कामाचा उत्साह वाढतोय"शरद पवार हे वयाच्या ऐंशीव्या वर्षी कार्यरत आहेत. सुप्रिया सुळेदेखील पन्नाशीला पोहचल्या आहेत. मी पण साठी ओलांडली. मात्र, वय वाढल्याचे कळेना. वय वाढतेय तसा दिवसेंदिवस उत्साह वाढतोय हे सांगताना कामाचा उत्साह वाढतोय, दुसरे काही नाही," असे पवार मिश्किलपणे म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBaramatiबारामतीChief Ministerमुख्यमंत्रीNCPराष्ट्रवादी काँग्रेस