शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेतील वाक्-युद्धानंतर छगन भुजबळांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, एक तास चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 10:56 IST

विधिमंडळाच्या अलीकडे झालेल्या अधिवेशनात भुजबळ आणि फडणवीस यांचे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाक्युद्ध रंगले होते.

यदु जोशी -

मुंबई - राज्याचे ज्येष्ठ मंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली ही भेट राजकीय स्वरूपाची होती, अशी चर्चा असली तरी दोघांची स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण कसे टिकवायचे याबाबत चर्चा झाली असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. 

केंद्र सरकारने एसईसीसी डाटा उपलब्ध करून दिल्यास राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यासाठी आवश्यक असलेला इम्पिरिकल डाटा तयार करणे अधिक सोपे जाईल, अशी भुजबळ यांची भूमिका आहे. हा डाटा केंद्र सरकारने महाराष्ट्राला द्यावा अशा मागणीचा ठराव राज्य विधिमंडळाने अलिकडेच मंजूर केला होता.केंद्र सरकारकडे आणि विशेषता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे फडणवीस यांनी वजन वापरावे आणि हा डाटा महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती भुजबळ यांनी फडणवीस यांना भेटून केली.

ओबीसींचा डाटा केंद्र सरकारने तत्काळ जाहीर करावा; काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांची मागणी

तुमच्या नेतृत्वात पंतप्रधानांकडे जाण्याची आमची तयारी आहे, असे भुजबळ या भेटीत फडणवीस यांना म्हणाले त्यावर राज्यात आपले सरकार आहे आणि  म्हणून पंतप्रधान मोदी यांना आपल्या नेतृत्वात भेटावे. सोबत मी शंभर टक्के राहीलच असे फडणवीस यांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे आरक्षण कुठल्याही परिस्थितीत पुन्हा बहाल झाले पाहिजे यासाठी एकदिलाने काम करण्याची भावना दोन्ही नेत्यांनी या भेटीत व्यक्त केली.

विधिमंडळाच्या अलीकडे झालेल्या अधिवेशनात भुजबळ आणि फडणवीस यांचे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाकयुद्ध रंगले होते. मात्र आज दोघांनीही एकत्र येत ओबीसी आरक्षणासाठी खांद्याला खांदा लावून काम करण्याची संकेत दिले.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसOBC Reservationओबीसी आरक्षणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा