शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’वर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली 'अशी' प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 16:56 IST

सरकारच्या प्रमुख खात्यांवरील चांगल्या वाईट हालचालीवर लक्ष ठेवण्याची संबंधित नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

मनसेच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्ताने वाशीत मेळावा पार पडला. पहिल्यांदाच मुंबईबाहेर पक्षाचा वर्धापन दिनाचा मेळावा होत असून त्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेचे इतरही नेते उपस्थित होते. वर्धापनदिनानिमित्त पक्षाची शॅडो कॅबिनेट जाहीर करण्यात आली असून यामध्ये कॅबिनेटमधील नेत्यांवर राज्य सकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवण्याचे काम सोपवण्यात आले आहे. मनसेच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर म्हणाले की, सरकार कोणत्या प्रकारे काम करत आहे. तसेच सरकारविषयी काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे जाणून घेण्याचा अधिकार जसा माध्यमांना आहे त्याचप्रमाणे सामान्य जनतेला देखील आहे. मनसेचे सध्या आमदार व नगसेवक जास्त नसल्यामुळे पक्षाला पुन्हा एकदा भरारी घ्यायची आहे. त्यामुळे काही कामं चालू ठेवण्यासाठी मनसेच्या नेत्यांना राज ठाकरेंनी कामं दिली आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितले.

मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटची नावे घोषित केली. त्यामध्ये सरकारच्या प्रमुख खात्यांवरील चांगल्या वाईट हालचालीवर लक्ष ठेवण्याची संबंधित नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात राज्यभरातील प्रमुख मनसे पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच शॅडो कॅबिनेटमध्ये अमित ठाकरे यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. 

राज ठाकरेंनी आपल्या भाषणात शॅडो केबिनेटच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे देखील कान खेचले. संबंधित खात्यावर देखरेखीची जबाबदारी मिळाली म्हणजे, आपण मंत्री झालो असे कोणाला वाटू नये असेही त्यांनी सांगितले. पैशाचं खातं मिळाल नाही म्हणून हट्ट देखील करू नये अशी कोपरखळी देखील राज ठाकरेंनी यावेळी मारली. शॅडो केबिनेटची जबाबदारी सरकारच्या चुकीच्या कामांवर ताशेरे ओढण्याची असेल. यादरम्यान चांगल्या कामाचं कौतुक देखील त्यांनी करावं असेही राज ठाकरे यांनी सुचवले. तर आरटीआय टाकून ब्लॅकमेल करण्याचा काहींचा धंदा झाला असून यापुढे असे आरटीआय टाकायचे नाही अशी तंबी देखील राज ठाकरेंनी यावेळी दिली. 

महाविकास आघाडी सरकारच्या नगरविकास आणि पर्यटन विभागावर अमित ठाकरे लक्ष ठेवतील. महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यटन विभागाची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे आहे. त्यामुळे एका ठाकरेंच्या खात्यावर दुसऱ्या ठाकरेंचा वॉच असेल. आदित्य ठाकरे पहिल्यांदाच मंत्री म्हणून काम करत आहेत. तर अमित ठाकरे सक्रिय राजकारणात आल्यापासून त्यांच्याकडे पहिलीच मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे अमित ठाकरे कसं काम करतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लागलं आहे. 

अशी आहे मनसेची शॅडो कॅबिनेट-

गृह, विधी व न्याय, जलसंपदा, सामान्य प्रशासन- बाळा नांदगावकरकिशोर शिंदेसंजय नाईकराजू उंबरकरराहुल बापटअवधूत चव्हाणप्रवीण कदमयोगेश खैरेमाजी पोलीस अधिकारी बुद्धिवंतप्रसाद सरफरेडॉ. अनिल गजनेअ‍ॅड. रवींद्र पाष्टेअ‍ॅड. जमीर देशपांडेअ‍ॅड. दीपक शर्माअनिल शिदोरे - जलसंपदा

मराठी भाषा, माहिती व तंत्रज्ञान-अनिल शिदोरेअमित ठाकरेअजिंक्य चोपडेकेतन जोशी

वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण आणि उद्योग-नितीन सरदेसाईहेमंत संभूस - (उद्योग)वसंत फडकेमिलिंद प्रधानपीयूष छेडाप्रीतेश बोराडेवल्लभ चितळेपराग शिंत्रेअनिल शिदोरे - वित्त व नियोजन 

महसूल आणि परिवहन- अविनाश अभ्यंकरदिलीप कदमकुणाल माईणकरअजय महालेसंदीप पाचंगेश्रीधर जगताप

ऊर्जा-शिरीष सावंतमंदार हळबेसागर देव्हरेविनय भोईटे

ग्रामविकास-अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्करअमित ठाकरेपरेश चौधरीप्रकाश भोईरअनिल शिदोरे

वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन-संजय चित्रेअमित ठाकरेवागिश सारस्वतसंतोष धुरीआदित्य दामलेललीत यावलकर

शिक्षण-अभिजीत पानसेआदित्य शिरोडकर - उच्च शिक्षणसुधाकर तांबोळीचेतन पेडणेकरबिपीन नाईकअमोल रोग्ये

कामगार-राजेंद्र वागस्करगजानन राणेसुरेंद्र सुर्वे

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण- रिटा गुप्ताकुंदा राणे

सहकार आणि पणन- दिलीप धोत्रेकौस्तुभ लिमये वल्लभ चितळेजयदेव कर्वे

अन्न व नागरी पुरवठा- राजा चौगुलेमहेश जाधववैभव माळवेविशाल पिंगळे

मत्स्यविकास आणि बंदरे- परशुराम उपरकरजितू चव्हाणनिशांत गायकवाड

महिला व बालविकास- शालिनी ठाकरेसुनिता चुरी

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळता)- योगेश परुळेकरअभिषेक सप्रेसीमा शिवलकर

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)- संजय शिरोळकर

रोजगार हमी आणि फलोत्पादन- बाळा शेडगेआशिष कोरी

सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार- अमेय खोपकर

कृषी व दुग्धविकास- संतोष नागरगोजेसंजू पाखरेअमर कदम

कौशल्य विकास व उद्योजकता- स्नेहल जाधव

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य- गजानन काळेअ‍ॅड. संतोष सावंतअनिल करपे

ग्राहक संरक्षण-प्रमोद पाटील

राज्य उत्पादन शुल्क- वसंत फडके

आदिवासी विकास-आनंद एंबडवारकिशोर जाचकपरेश चौधरी

पर्यावरण- रुपाली पाटीलकीर्तिकुमार शिंदेजय शृंगारपुरेदेवव्रत पाटील

खार जमिनी पुनर्विकास आणि भूकंप पुनर्वसन- अनिता माजगावकर

पाणीपुरवठा आणि सार्वजनिक स्वच्छता- अरविंद गावडे

क्रीडा व युवक कल्याण- विठ्ठल लोकणकर अरुण जांभळे

अल्पसंख्याक विकास आणि वक्फ- इरफान शेखसईफ शेखजालीम तडवीजावेद शेखअल्ताफ खान

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेChagan Bhujbalछगन भुजबळMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार