शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

NCP vs BJP: लोक भारताचं नागरिकत्व का सोडत आहेत? राष्ट्रवादीचा मोदी सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 14:39 IST

केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला दिलं होतं उत्तर

NCP vs BJP: केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना, नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या भारतीयांची वार्षिक आकडेवारी उपलब्ध करून दिली. केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येण्यापूर्वीची आणि नंतरची अशी आकडेवारी त्यांनी संदर्भासाठी सांगितली. त्यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीकास्त्र सोडण्यात आले. भाजपा सरकारच्या म्हणण्यानुसार आपल्या देशात सर्वकाही ठीक चालले असेल, तर जगभरातील भारतीयांनी मोठ्या संख्येने भारतात परत यायला हवे. लोक भारताचे नागरिकत्व का सोडत आहेत? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांनी मोदी सरकारला केला.

"जयशंकर हे ठसवण्याचा प्रयत्न करत होते की गेल्या काही वर्षांत नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या कमी-अधिक प्रमाणात सारखीच होती. पण यात एक लक्षात घेणे आवश्यक आहे की २०२१ मध्ये सर्वाधिक भारतीयांनी नागरिकत्व सोडले आहे. गेल्या दशकातील नागरिकत्व सोडणाऱ्यांची ही सर्वोच्च संख्या आहे, हे सरकारी आकडेवारी दर्शवते. परराष्ट्र मंत्र्यांनी जसे नागरिकत्वाबाबत २०१४ पूर्वीचे व नंतरचे दाखले दिले त्याप्रमाणेच आता बेरोजगारी, महागाई, जीडीपी आणि कच्च्या तेलाच्या किमतीच्या तुलनेत इंधनाच्या किमती आदीचा २०१४ पूर्वीचा आणि नंतरचा डेटा देखील दाखवावा," असे क्रास्टो यांनी आवाहन केले.

"भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतरच आपला देश भारत कसा प्रगतीपथावर आहे आणि कसा समृद्ध झाला आहे, हे सतत ठसवले जात आहे. यावर विश्वास ठेवायचा असेल, तर प्रश्न असा पडतो की, मग लोक आपले भारतीय नागरिकत्व का सोडत आहेत? भाजप सरकारच्या म्हणण्यानुसार आपल्या देशात सर्वकाही ठीक चालले असेल, तर जगभरातील भारतीयांनी मोठ्या संख्येने भारतात परत यायला हवे. श्री एस जयशंकर कदाचित इतर सर्व डेटा देणार नाहीत. कारण सत्य हे आहे की, अनेक भारतीय आपले नागरिकत्व सोडत आहेत आणि भारतातील उच्च बेरोजगारीमुळे परदेशात निघून जात आहेत. ज्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये आपली पडझड झाली होती. हे तथ्य सरकारी आकडेवारीनेच सिद्ध केले आहे, जी म्हणते की आपल्या देशातील ४५ वर्षातील बेरोजगारीचा दर सर्वाधिक आहे," असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा