शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

पुन्हा कोरोनाचा धोका; मंत्री धनंजय मुंडेंची चाचणी पॉझिटिव्ह, पुण्यातील घरी क्वारन्टाइन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 16:51 IST

मंत्री धनंजय मुंडे यांना गेल्या काही दिवसांपासून खोकल्याचा त्रास सुरू होता.

Dhananjay Munde Coronavirus ( Marathi News )  : राज्यात आणि देशात कोरोना संसर्ग पुन्हा वाढीस लागला असून अनेक ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागले आहेत. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांना गेल्या काही दिवसांपासून खोकल्याचा त्रास सुरू होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना चाचणी केली असता ही चाचणी पॉझिटिव्ह आली. तेव्हापासून मुंडे हे पुण्यातील आपल्या घरी विलगीकरणात असून तिथेच ते औषधोपचार घेत आहेत.

पुण्यातील मॉडर्न कॉलनी परिसरात मंत्री धनंजय मुंडे यांचे घर आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून या घरी ते राहात असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मात्र कोरोना चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत ते पुण्यातील घरीच विलगीकरणात राहतील, अशी माहिती आहे.

रुग्णसंख्या वाढली, राज्यातील आरोग्य व्यवस्था 'अलर्ट मोड'वर!

महाराष्ट्रात कोरोना पुन्हा डोके वर काढत असताना सार्वजनिक आरोग्य विभागाने आधीचा टास्क फोर्स रद्द करून नवीन टास्क फोर्सची स्थापना केली आहे. आरोग्य क्षेत्रात संशोधन करणाऱ्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर अध्यक्षपदी असतील असे समजते. २०२० च्या एप्रिल महिन्यात कोरोनाच्या थैमानाला सुरुवात झाली. त्यावेळी राज्य सरकारने डॉ. संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमला होता.  कोरोनाच्या रुग्णसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी टास्क फोर्सने मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आता नव्याने रुग्ण सापडू लागल्याने आरोग्य विभागाने पुन्हा टास्क फोर्सची पुनर्रचना करण्याचे काम सुरू केले आहे. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  या टास्क फोर्सच्या सदस्यपदी १७ पेक्षा अधिक सदस्य असण्याची शक्यता आहे.   महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप  मैहसेकर, मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह या फोर्समध्ये सदस्य म्हणून असतील. तसेच, पुणे येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे वरिष्ठ तज्ज्ञ, ससून रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्र तज्ज्ञ, कम्युनिटी मेडिसिन विभागातील तज्ज्ञ आणि अन्य काही सदस्यही यात असतील, असे समजते.

राज्यात आतापर्यंत कुठे किती रुग्ण आढळले?

राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. सध्या राज्यात १०३ सक्रिय रुग्ण आहेत. शनिवारी  राज्यात ३५ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबई - १८, ठाणे पालिका क्षेत्र -४, कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्र -१, रायगड-१, पनवेल -१,  पुणे पालिका क्षेत्र-६, पिंपरी चिंचवड पालिका क्षेत्र-१, सातारा - २,  सांगली -१, सांगली, मिरज, कुपवाड पालिका क्षेत्र -१.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस