शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

भारतरत्नांनी पदाला साजेसं बोलावं; मंगेशकर, तेंडुलकर यांच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे: अमोल मिटकरी

By देवेश फडके | Updated: February 9, 2021 12:26 IST

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी याला उत्तर देताना मंगेशकर असो वा तेंडुलकर, सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देअमोल मिटकरी यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवारमंगेशकर असो वा तेंडुलकर, ट्विटची चौकशी झालीच पाहिजे - अमोल मिटकरीट्विटच्या चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

मुंबई :शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, समर्थन देण्यावरून सुरू झालेलं ट्विटरवॉर शमण्याचं नाव घेताना दिसत नाही. सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटची चौकशी करण्यात येण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टीका केली होती. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी याला उत्तर देताना मंगेशकर असो वा तेंडुलकर, सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी केली आहे. (ncp leader amol mitkari criticized devendra fadnavis over Celebrities tweet) 

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करत सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे, असे म्हटले आहे. ''सेलिब्रिटींच्या ट्वीटची चौकशी झालीच पाहिजे. मग, मंगेशकर असोत की तेंडुलकर! 'भारतरत्नांनी' पदाला साजेसं असंच बोलावं वागावं व लिहावं. फडणवीसांनी भारतरत्नांची बाजू घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा आदर्श परिपाठ सुद्धा वाचून घ्यावा'', असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. 

शेतकरी आंदोलन हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. भारताच्या अंतर्गत मुद्द्यावरून परदेशातील सेलिब्रिटिंनी केवळ बघ्याची भूमिका घ्यावी. देशातील प्रश्न आमचे आम्ही सोडवू, अशा आशयाचे ट्विट्स भारतरत्न लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांसह अनेक कलाकार, खेळाडू आणि दिग्गज मंडळींनी केले होते. यानंतर शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटींच्या ट्विटमध्ये बरेच साधर्म्य दिसून येत असल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट उघड; नांदेडमधून खलिस्तान समर्थक दहशतवादी अटकेत

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशानंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. राज्य सरकारचा सेलिब्रेटीच्या ट्विट करण्याचा निर्णय हा संतापजनक असून कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत, निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसTwitterट्विटरFarmers Protestशेतकरी आंदोलन