शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा विरोधी पक्षनेते पदावर दावा; जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आमची संख्या जास्त, पण...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 16:17 IST

Maharashtra Political Crisis: विरोधी पक्षनेतेपदावरून आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political Crisis: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात मागील साडेतीन वर्षांत तिसरा महाभूकंप झाला. यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारांना परत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. यावरून आता दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी यावर भाष्य केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आणि प्रतोद म्हणून नियुक्ती केलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने आता काँग्रेस हा महाविकास आघाडीमधील  मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात येत आहे. ज्या पक्षाचे अधिक सदस्य त्यांचा विरोधी पक्षनेता व्हायला पाहिजे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. 

महाविकास आघाडीच्या एकत्रेसाठी उभे राहू

विरोधी पक्षनेता हा संख्येवरून ठरवला जातो. सध्यातरी आमची संख्या जास्त आहे. उद्या काय होते, ते पाहूया. संख्या कमी असली, तरी आम्हाला विरोधी पक्षनेतेपद द्या, यासाठी आम्ही आग्रही नाही. इतके अपरिपक्व वागणे राष्ट्रवादी करणार नाही. राष्ट्रवादीला महाविकास आघाडी एकत्र ठेवायची आहे. त्यामुळे आमचा बळी गेला तरी चालेल. पण, महाविकास आघाडीच्या एकत्रेसाठी उभे राहू, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील. आमची संख्या ९ जणांनी कमी झाली आहे, कारण ते गेलेल आहेत. उरलेले आमदार राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत. आम्हाला काँग्रेस पक्षाशी वाद करायचा नाही. आम्ही बसून निर्णय घेऊ. आमची संख्या कमी असेल तर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो, यासाठी काही दिवसांचा कालावधी जाऊ शकतो, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षJitendra Awhadजितेंद्र आव्हाडMahavikas Aghadiमहाविकास आघाडी