शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Jayant Patil, Winter Session at Nagpur: जयंत पाटील यांचे निलंबन; मविआ आमदारांची विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 17:13 IST

सरकारचा निर्लज्जपणाचा कहर, भ्रष्टाचारी सरकार हाय हाय- अशा दिल्या घोषणा

Jayant Patil, Winter Session at Nagpur: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशन कालावधीत निलंबित करण्यात आले. विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. जयंत पाटील यांना निलंबित करण्याची मागणी सत्ताधारी गटातील सदस्यांनी केली होती. या संदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. जयंत पाटील यांच्या निलंबना विरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाल्याचे दिसून आले. विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी निर्णयाचा निषेध केला.

महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या सरकारचा धिक्कार असो... निर्लज्ज सरकारचा, निर्लज्जपणाचा कहर... जयंत पाटील, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है... नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी... भ्रष्टाचारी सरकार हाय हाय... खोके लेनेवालों, को जुते मारो सालों को... खोके सरकार हाय हाय... अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर निदर्शने केली आणि आमदार जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

महाविकास आघाडीतील नेतेमंडळींनी निलंबनाच्या निर्णयावर बोलताना सांगितले की, सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षांना प्रश्न मांडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सभागृहात केला जात होता याचा निषेध करण्याचा प्रयत्न विरोधी आमदारांनी केला असता राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आमदार जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले. त्या विरोधात महाविकास आघाडी सरकारने सभात्याग करत पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निलंबनानंतर, "या निर्लज्ज 'सरकार' विरोधात लढत राहणार... बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय...!" असे ट्विट करत जयंत पाटील यांनीही संघर्ष करण्याचा संदेश दिला.

याचवेळी, आमदार जयंत पाटील यांना उचलून घेत आमदारांनी 'जयंत पाटील तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है' अशी जोरदार घोषणाबाजी केली.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीnagpurनागपूर