चिखलीत राष्ट्रवादीला भाजपा वरचढ

By Admin | Updated: February 27, 2017 00:20 IST2017-02-27T00:20:47+5:302017-02-27T00:20:47+5:30

चिखली-मोरेवस्ती प्रभाग क्रमांक १ मध्ये मतदारांनी भाजपाला अनपेक्षित यश मिळवून दिले

NCP gets dominant over Chikhliyat | चिखलीत राष्ट्रवादीला भाजपा वरचढ

चिखलीत राष्ट्रवादीला भाजपा वरचढ


चिखली : चिखली-मोरेवस्ती प्रभाग क्रमांक १ मध्ये मतदारांनी भाजपाला अनपेक्षित यश मिळवून दिले असून, राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. चिखली प्रभागात अ गटातील भाजपाचे कुंदन गायकवाड विजयी झाले असून, शिवसेनेचे नितीन रोकडे दुसऱ्या, तर राष्ट्रवादीपुरस्कृत सतीश दिघे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ब गटात भाजपच्या स्विनल म्हेत्रे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्वाती साने यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत स्विनल म्हेत्रे यांना विजय प्राप्त झाला. क गटात अपक्ष उमेदवार साधना मळेकर यांनी अनपेक्षितपणे सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या सोनम मोरे यांना मोठ्या फरकाने पराभूत केले. याच गटात अलका मोरे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
ड गटात कार्यक्षम नगरसेवक दत्ता साने यांच्यावरच पुन्हा मतदारांनी विश्वास टाकला असून, शिवसेनेचे नेताजी काशीद यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, तर भाजपाचे पांडुरंग साने यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. प्रभाग क्रमांक १ मधून कुंदन गायकवाड, स्विनल मेहत्रे, साधना मळेकर या नवीन चेहऱ्यांना महापालिका सभागृहात जाण्याची संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांना मतदारांनी पुन्हा प्रभागात कार्यरत ठेवले आहे.
भाजपाचे प्रचारप्रमुख किसन बावकर यांनी सांगितले, की प्रभागात विकासाचा मुद्दा जनतेसमोर मांडला व नवीन चेहऱ्यांना बरोबर घेऊन राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात दोन जागा मिळविल्या असून, अपक्ष उमेदवार आपल्या संपर्कात असल्याचे सांगितले. (वार्ताहर)

Web Title: NCP gets dominant over Chikhliyat