ED चा ससेमिरा, भाजपचा निशाणा; शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 07:31 PM2021-08-30T19:31:20+5:302021-08-30T19:32:35+5:30

राज्यातील एकूण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या नेत्यांची एक तातडीची बैठक बोलावली आहे.

ncp chief sharad pawar calls party leaders meeting on 31 august | ED चा ससेमिरा, भाजपचा निशाणा; शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक

ED चा ससेमिरा, भाजपचा निशाणा; शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक

Next

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अनेक नेते, मंत्री यांच्या मागे सक्तवसुली संचालनालयाचा (ED) ससेमिरा लागल्याचे पाहायला मिळत आहे. नोटिसा, छापे यांचे सत्र सुरूच आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री यांचाही समावेळ आहे. राज्यातील एकूण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या नेत्यांची एक तातडीची बैठक बोलावली आहे. (ncp chief sharad pawar calls party leaders meeting on 31 august)

ED नोटिसीनंतर धावाधाव! अनिल परब घाईघाईत संजय राऊतांच्या भेटीला; १० मिनिटांत माघारी

एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटीस, भाजपची नुकतीच झालेली जनआशीर्वाद यात्रा तसेच भाजपकडून केला जाणारा हल्लाबोल या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला महत्त्व आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक महत्त्वाची पण तातडीची बैठक ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी होत आहे.  या बैठकीत कामकाजाचा आढावा आणि विविध विषयांवर चर्चा अपेक्षित आहे, अशी माहिती मिळाली आहे. 

“आता पळपुटेपणा न करता हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा”; नितेश राणेंचा टोला

कोण कोण नेते राहणार उपस्थित?

शरद पवारांनी बोलावलेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणे अपेक्षित आहे. यामध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड,  राजेश टोपे, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व १६ मंत्र्यांचा समावेश असेल, असे सांगितले जात आहे. शरद पवार हे नियमित अंतराने पक्षाच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेत असतात. प्रत्येक मंत्र्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जाते. ज्या मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याची गरज असते, त्यांना सूचना, सल्ले दिले जातात. तसेच राज्याच्या राजकारणातील काही विषयांवर चर्चा अपेक्षित आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

याला म्हणतात भन्नाट रिटर्न! १० हजारांच्या SIP चे झाले १.०८ कोटी; ‘या’ फंडाची दमदार कामगिरी

किरीट सोमय्यांच्या ११ जणांच्या यादीत राष्ट्रवादीचे तिघे

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारशी संबंधित ११ जणांवर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करून ठाकरे सरकारचे ‘महान’ ११ असे कॅप्शन देऊन अनेकांची नावे दिली आहेत. या ११ जणांमध्ये राष्ट्रवादीशी संबंधित जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ आणि अनिल देशमुख यांचा समावेश आहे. याबाबत राष्ट्रवादी उद्याच्या बैठकीत चर्चा होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

काय सांगता! देशभरात ३,६०० गावे ‘राम’नामावर, तर ३,३०९ गावांच्या नावांमध्ये कृष्णाचा उल्लेख

दरम्यान, ईडीने नुकतेच शिवसेना नेते अनिल परब यांना नोटीस पाठवली आहे. अनिल परब यांच्यासह शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या ५ कार्यालयांवर छापेमारी केली. तसेच अनिल देशमुख यांच्याशी संबंधित काही ठिकाणावर छापे टाकले. या एकूण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील रणनीती काय आखणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
 

Web Title: ncp chief sharad pawar calls party leaders meeting on 31 august

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.