शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

बाप दाखवा नाहीतर...; छगन भुजबळ समर्थक चिडले, रोहित पवारांना खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 16:40 IST

छगन भुजबळ जे काही म्हणाले त्यात चुकीचं काय? जर चुकीचं असेल तर सिद्ध करा असं आव्हान भुजबळ समर्थकांनी रोहित पवारांना दिलं आहे.

पुणे - महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त पुण्यात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून आता राष्ट्रवादीतच गटबाजी झाल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी नेते आमदार रोहित पवार यांनी कुठलेही विधान करताना आपण काळजी घेतली पाहिजे असं म्हटलं. भुजबळांवर विचारलेल्या प्रश्नावर रोहित पवारांनी असं विधान केल्याने आता छगन भुजबळ समर्थक चिडल्याचं दिसून येत आहे. 

पुण्यात भुजबळ समर्थकांनी रोहित पवारांचा निषेध केला. भुजबळ समर्थक सपना माळी शिवणकर म्हणाल्या की, छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहे. काल उगवलेला पोरगा अशा शब्दांमध्ये बोलत असाल ही भूमिका असेल आम्ही त्यांचा निषेध करणारच. आम्ही राष्ट्रवादी समर्थक नाही भुजबळांची समर्थक आहे. जेव्हा जेव्हा साहेबांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत असेल तेव्हा आम्ही शांत बसणार नाही. भुजबळसाहेबांबद्दल पुन्हा असं वक्तव्य करू नका असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत छगन भुजबळ जे काही म्हणाले त्यात चुकीचं काय? जर चुकीचं असेल तर सिद्ध करा. रोहित पवारांनी अभ्यास करावा. पुरोगामी म्हणून ते पक्षाची धुरा सांभाळणारे असतील तर त्यांनी अभ्यास करणे गरजेचे आहे. काळजीपूर्वक बोलावं म्हणजे कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकणारं आहे. रोहित पवारांनी पातळी ओळखावी. पुस्तक वाचावी. तुम्ही बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला. खोटे असेल तर सिद्ध करा. समतेचा विचार घेऊन भुजबळ पुढे चालले. ते पक्षाच्या कार्यक्रमात बोलले नव्हते. फुलेंचा विचार पुढे मांडत असतील तर त्यांना विरोध करण्याचं कारण काय? असा सवाल भुजबळ समर्थक सपना माळी शिवणकर यांनी विचारला आहे. 

काय म्हणाले होते रोहित पवार?सरस्वतीनं किती शाळा बांधल्या, किती लोकांना शिकवलं? असं छगन भुजबळ एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी म्हटलं होतं की, कोणत्याही देवदेवतांचा अपमान होणार नाही. याची काळजी सर्वच घेतात. भुजबळसाहेबांनी केलेले विधान मी ऐकलेले नाही. ते कोणत्या उद्देशाने बोलले माहिती नाही. पण देव, देवता, थोर व्यक्ती, धार्मिक अध्यात्मिक याविरोधात कुणी बोलायला नको. बोलताना सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. 

भुजबळांनी दिला सल्लामी रोहित पवारांच्या विधानावर फार काही बोलणार नाही. केवळ त्यांनी अभ्यास करावा. कारण त्यांच्या घराण्याला सत्यशोधक विचारांचा मोठा वारसा लाभलेला आहे. त्यांचे आजोबा, पणजोबा सर्व सत्यशोधक विचारांच्या मुशीतून तयार झालेले आहेत. हळूहळू त्यांच्या लक्षात येईल असं सांगत छगन भुजबळांनी रोहित पवारांना सल्ला दिला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारChhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेस