शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

'भुजबळांना भाजपची ऑफर?'; फडणवीस मौन असल्याचं सांगत जरांगेंचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 11:56 IST

अहमदनगर : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सुरू झालेला संघर्ष आणखीनच टोकदार होण्याची शक्यता आहे. कारण मराठा आरक्षण आंदोलक मनोज ...

अहमदनगर : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सुरू झालेला संघर्ष आणखीनच टोकदार होण्याची शक्यता आहे. कारण मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. "छगन भुजबळ यांना भाजपमध्ये पलटी मारायची तर नाही ना? कारण त्यांनी याआधीही अनेकदा पलटी मारली आहे," असा हल्लाबोल जरांगे पाटलांनी केला आहे.

छगन भुजबळ यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबत आक्रमक वक्तव्ये होत असतानाही त्यावर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन बाळगल्याचं सांगत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "छगन भुजबळ यांना भाजपकडून काहीतरी ऑफर आली असेल. कारण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे काहीच बोलत नाही आणि त्यांना थांबवतही नाहीत. मराठा समाजाला त्रास देण्यासाठी काही पलट्या मारण्याचे ठरलं आहे का, अशी आम्हाला शंका येत आहे. मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं करण्यासाठी सरकारने छगन भुजबळ यांना फूस लावली नाही ना?" अशी शंका जरांगे यांनी उपस्थित केली आहे.

येवल्यात पोस्टर्स फाडले, जरांगेंचा रोख कोणाकडे?

मनोज जरांगे पाटील यांची नुकतीच नाशिक येथे सभा पार पडली. या सभेच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत विविध ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर्स अज्ञात व्यक्तींकडून फाडण्यात आले होते. याबद्दल बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, "हा प्रकार झाला असला तरी मराठा समाजाने शांत राहिले पाहिजे. पोस्टर फाडल्याने काही होणार नाही. पण राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोण बिघडवत आहे, याकडे गृहमंत्री फडणवीसांनी बघितलं पाहिजे. फडणवीस यांच्या मनात काय आहे, हे एकदा त्यांनी सांगायला पाहिजे," असंही जरांगे पाटील म्हणाले. 

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची आज अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे सभा होणार असून या सभेत त्यांच्या निशाण्यावर कोण असणार, हे पाहावं लागेल. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण