शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
4
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
5
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
6
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
7
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
8
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
9
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
10
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
11
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
12
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
13
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
14
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
15
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
16
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
17
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
18
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
19
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
20
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 19:09 IST

NCP AP Group Sunil Tatkare Replied Raj Thackeray: लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला अजित पवार गटाच्या नेत्याने स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.

NCP AP Group Sunil Tatkare Replied Raj Thackeray: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात. या योजनेत आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत. तसेच कोट्यवधी रुपयांचा निधी महिलांच्या खात्यात वळते करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या योजनेची मुदत वाढवण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुदत आणखी वाढवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले जात आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली. ऑक्टोबरचा पहिला हप्ता दिल्यानंतर जानेवारी महिन्यात पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे नसणार. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील तर त्याचा राज्यावर परिणाम होईल. राज्य खड्ड्यात घातले जात असेल तर हे चुकीचे आहे. महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणले पाहिजे, रोजगार दिला पाहिजे. समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही, या शब्दांत राज ठाकरे यांनी निशाणा साधला. 

महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांचा अवमान आहे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरे काय बोलले? याबाबत मला काही माहिती नाही. पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना स्वार्थी आहे, असे म्हणणे म्हणजे महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांचा अवमान आहे असे मानतो. आता राज ठाकरे नेमकी कोणत्या हेतूने बोललेत हे मला माहिती नाही. पण तुम्ही सांगितलेल्या माहितीवरून बोलत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरे यांचे जर ते वाक्य असेल तर ते योग्य नाही असे माझे स्पष्ट मत आहे, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी केला.

अशा प्रकारची वक्तव्य करणे हे दुर्देवी आहे

पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे यांना प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर केलेल्या टीकेबाबतही विचारण्यात आले. एखाद्या योजनेबाबत बोलत असताना महिलांना लालूच दाखवली अशा प्रकारचा शब्द प्रयोग करणे म्हणजे त्या महिला असतानाही महिलांचा अपमान करत असल्याचे त्या विसरत आहेत. मला वाटते की, प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या वक्तव्यावर आत्मपरीक्षण करावे आणि योग्य भूमिका घ्यावी. राजकीय विरोध समजू शकतो. महायुतीच्या सरकारला किंवा नेतृत्वाला तुम्ही दोष द्या. मात्र, अशा प्रकारचे वक्तव्य का करता? हे मला काही कळत नाही. ज्यांनी निवडणूक लढवेली आहे, त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करणे हे दुर्देवी आहे, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाsunil tatkareसुनील तटकरेRaj Thackerayराज ठाकरेPraniti Shindeप्रणिती शिंदेPraniti Shindeप्रणिती शिंदेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४