शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणुका कमळ की घड्याळ चिन्हावर लढणार?; अजित पवारांचे सूचक विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 21:18 IST

NCP Ajit Pawar Group News: पक्षाची भूमिका स्पष्ट करताना अजित पवार म्हणाले की, कोणतीही किंमत मोजावी लागली तर चालेल, पण...

NCP Ajit Pawar Group News ( Marathi News ): आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील पक्ष आता चांगलेच कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा केला. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. तर अजित पवार गट आणि शिंद गट कमळ चिन्हावर निवडणुका लढवतील, असा दावा करणाऱ्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. यावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची एक बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. महायुतीत अंतर पडेल असे काही वागू नका, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच भेटीगाठी कौटुंबिक असून कुठेही मॅचफिक्सिंग नाही. आमच्यासोबत जे आले आहेत त्यांना फसवणार नाही. माझ्या भूमिकेत कुठेही बदल होणार नाही. हवे तर हे स्टॅम्पवर लिहून देतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

कोणतीही किंमत मोजावी लागली तर चालेल, पण...

मार्च महिन्यात आचारसंहिता लागणार आहे. त्यासाठी संघटनात्मक काम करा. धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामी विचार हा पक्षाचा आत्मा आहे. ही विचारधारा सोडायची नाही त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तर चालेल, असे अजित पवार यांनी नमूद केले. ज्येष्ठांवर टीका करायची नाही पण कोणी आपल्या नेत्यांवर बोलले तर जशास तसे उत्तर द्या, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. कमळाच्या चिन्हावर नाही तर आपण घड्याळाच्या चिन्हावरच निवडणूक लढणार. प्रत्येकाचा काम करण्याचा काळ असतो. वयोमानाप्रमाणे नवी पीढी पुढे येत असते, त्यांना मार्गदर्शन करावे लागते. मात्र, काही जण ऐकायला तयार नव्हते. काही जण जाणीवपूर्वक सांगत आहेत की हे कमळावर लढणार आहेत. पण असे काही नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आपल्याला गद्दारी, मॅच फिक्सिंग करायची नाही. मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहे. खरगे यांचे नाव काँग्रेसकडून पुढे येत आहे. मोदींविरूद्ध खरगे यात तुम्हीच विचार करा की खरगे यांनी काही फार मोठे नेतृत्व केले नाही. जनता मोदींनाच पाठिंबाच देईल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस