Indurikar Maharaj News: समाज प्रबोधनकार, कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे भन्नाट कीर्तन आणि विनोदी शैलीसाठी कायम चर्चेत असतात. इंदुरीकर महाराजांची कीर्तने लोकांना विचार करायला लावतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या साखरपुड्यामुळे इंदुरीकर महाराज चांगलेच चर्चेत आहेत. राजेशाही थाटात केलेल्या साखरपुड्यामुळे सोशल मीडियावर इंदुरीकर महाराज यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे. या ट्रोलिंगमुळे व्यथित झालेल्या इंदुरीकर महाराज कीर्तन सोडण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, फेटा खाली ठेवू नका, असे आवाहन इंदुरीकर महाराजांना करण्यात आले आहे.
ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार? लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
येत्या दोन ते तीन दिवसांत कीर्तन सेवा सुरू ठेवायची की, सोडायची याबाबत निर्णय घेणार असल्याचे इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे. याबाबत त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारयल झाला आहे. मुलीचा साखरपुडा, सोशल मीडियावर झालेले ट्रोलिंग आणि मुलीबाबत सोशल मीडियात आलेली प्रतिक्रिया याबद्दल इंदुरीकर महाराज त्या व्हिडिओत बोलताना पाहायला मिळत आहेत. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून इंदुरीकर महाराजांना आवाहन केले आहे.
फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा
इंदुरीकर महाराज राम कृष्ण हरी. तुम्ही फेटा खाली उतरायचा नाही. महाराज तुम्ही सोशल मीडियाच्या विकृत लोकांमुळे व्यथित झाला साहजिकच होणार, पण आपण आपल्या कर्तृत्वाने आपल्या कामाने सिद्ध आहात या सोशल मीडियाच्या विकृत छपरी जे माणूस नावावर कलंक आहेत यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नये. आपण आपल्या वारकरी प्रबोधनातून, किर्तन,भजनातून समाजातील माता,भगिनी,बंधू साठी अत्यंत मौल्यवान कार्य केले आहे.अध्यात्मिक शांती देत आहात. तेही या युगाशी समतोल साधून केले आहे.त्यामुळे आपण अजिबात व्यथित होऊ नका. तुमच्यासारखे महाराज नसतील घर घरातील बिघडलेले स्त्री,पुरुष चांगल्या मार्गावर येणार कसे त्यांना सदबुद्धी, चांगले विचार, चांगले कर्माचा रस्ता सांगणार कोण?
तुम्ही फेटा खाली उतरायचा नाही. तुमच्या सोबत अख्खा महाराष्ट्र आहे तुमचे कुटुंब म्हणून तुमच्या कुटुंबतील मी लेक आहे आमच्या भगिनी बद्दल कोण बोलत असेल तर त्या वेडी, विकृत माणसावर तुम्ही दुर्लक्ष करा. आम्ही पाहतो त्यांच्याकडे सोशल मीडियावर वेड्याचे सौंग घेण्याकडे त्या वेड्याचे सौंग काढण्याची सुद्धा हिंमत आहेत. त्यांची विकृती ठेचून काढू. अजिबात व्यथित होऊ नका आणि फेटा खाली ठेवायचा नाही.ही माझी आपणास लेक म्हणून विनंती आहे. फेटा खाली ठेवायचा नाही, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
सोशल मीडियावर ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज झाले व्यथित
- इंदुरीकर महाराज म्हणतात की, आम्ही किती कष्ट केली लोक याचा विचार करत नाहीत, आम्ही आमचा संसार किती कष्टातून मोठा केला याचा विचार लोक करत नाहीत, आमची मुले लहान असताना आठ-आठ दिवस माझी त्यांच्याशी गाठ नव्हती. आता लोक इतके खाली गेलेत की, माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत, यावरुन लोकांचे कमेंट्स आहेत. याच्यापेक्षा वाईट काय असेल? आता चार दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगावरील कपड्यांवर लोकांनी बातम्या तयार केल्या, पण तिच्या बापाला. मला तुम्ही काही बोला. माझा पिंड गेला. माझ्या मुलाचा आणि मुलीचा यात काय दोष आहे. पण या कॅमेरावाल्यांनी आठ दिवसात माझे जगणे मुश्किल करून टाकले आहे.
- मला एक सांगा. मुलगी तुम्हालाही आहे. तुमच्या मुलीच्या कपड्यांवर एखाद्याने कमेंट केली, तर तुम्हाला काय वाटेल? आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडचे घेतात की मुलीकडचे घेतात? मग कपडे त्यांनी आणले असतील की म्या घेतले असतील? एवढी तरी क्लिप टाकणाऱ्यांना लाज पाहिजे ना. माणूस नालायक असावा पण किती? त्याच्यामुळे आता मी कंटाळलो. जवळजवळ मी दोन-तीन दिवसात टाकणार आहे एक क्लिप. थांबून घेणार आहे आता.
- बास झाली ३१ वर्ष. लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळे चांगलेच केले, आयुष्यात चांगले पण त्याचे फळ. माझ्यापर्यंत ठीक होते, माझ्या घरादारापर्यंत जायला नको होते. मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला. मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे. मी अजून आहे ना. पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही. आणि ही अक्कल इंदुरीकरलाच आली पाहिजे. त्याने कीर्तन बंदच केले पाहिजे.
- खरे की खोटे? तुम्ही काहीच बोलत नाही. हे त्याने बंद केले पाहिजे. त्याला लाज वाटली पाहिजे की, आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा. त्याचे त्याने चांगले जगावे. आम्ही दोन तीन दिवसापासून विचार करत आहोत, दोन तीन दिवसात मी घेणारे निर्णय. पण मजा नाही राहिली त्याच्यात आता, या शब्दांत इंदुरीकर महाराजांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.
दरम्यान, इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा साहिल चिलाप या बांधकाम व्यावसायिकासोबत मोठ्या थाटामाटात पार पडला. त्याचे व्हिडिओ, फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. राजेशाही थाटात मुलीची आणि जावयाची रथावरून मिरवणूक, पाहुण्यांच्या उपस्थितीने गच्च भरलेले कार्यालय, वारकरी वेशात टाळकरी, बायकांनी धरलेला फेर, राजकीय पुढाऱ्यांची विशेष उपस्थिती चर्चेचा विषय ठरला. या सोशल मीडियावरील ट्रोलर्सना इंदुरीकर महाराजांची चोख उत्तर दिले.
Web Summary : Following social media trolling over his daughter's engagement, Indurikar Maharaj considered ending his Kirtan performances. Rupali Thombre Patil of NCP urged him to ignore trolls and continue his valuable social and spiritual work, assuring him of Maharashtra's support.
Web Summary : बेटी की सगाई पर सोशल मीडिया ट्रोलिंग के बाद, इंदुरीकर महाराज ने अपने कीर्तन प्रदर्शन को समाप्त करने पर विचार किया। राकांपा की रूपाली ठोंबरे पाटिल ने उनसे ट्रोल को अनदेखा करने और अपने सामाजिक और आध्यात्मिक कार्य को जारी रखने का आग्रह किया, और उन्हें महाराष्ट्र के समर्थन का आश्वासन दिया।