शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 15:05 IST

NCP Ajit Pawar: येत्या एक-दोन दिवसांत नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल.

NCP Ajit Pawar: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. महायुतीने या निवडणुकीत पहिल्यांदाच 235 पेक्षा जास्त जागांवर यश मिळवले. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. आता या निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार यांची सर्वानुमते पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली आहे. 

निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटात बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार असून, येत्या एक-दोन दिवसांत सरकारचा शपथविधी सोहळाही पार पडणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निकालानंतर अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरच्या झालेल्या बैठकीत अजित पवारांची गटनेतेपदी निवड झाली आहे. 

आज शिंदेसेनेचा गटनेता ठरणारशिवसेना शिंदे गटाचे आमदार मुंबईत यायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाने मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स हॉटेलमध्ये या सर्व आमदारांना ठेवले आहे. सध्या या हॉटेलमध्ये पक्षाचे बहुतांश आमदार उपस्थित आहे. उर्वरित आमदार आज संध्याकाळपर्यंत पोहोचतील. सर्वजण आल्यानंतर शिंदे गटाची बैठक होईल. या बैठकीत गटनेता निवडण्यात येईल. शिंदेसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड निश्चित मानली जात आहे.

महायुतीचा सर्वात मोठा विजययंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा इतिहासात नोंद होणार आहे. राज्यभरात महायुतीच्या विरोधात वातावरण असताना, महायुतीमध्ये सर्वात मोठा विजय मिळवला आहे. भाजपचे 132, शिवसेनेचे 57, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार विजयी झाले आहेत. बहुतांश ठिकाणी शिवसेना vs शिवसेना, राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी आणि भाजप vs काँग्रेस, अशी लढत होती. या लढतीत महायुतीने विरोधकांचा दारुण पराभव केला. तर दुसरीकडे सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीला 50 चा आकडाही गाठता आला नाही. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस