नवाजुद्दीनच्या पत्नीचीही शेजाऱ्यांविरुद्ध तक्रार

By Admin | Updated: January 19, 2016 03:55 IST2016-01-19T03:55:42+5:302016-01-19T03:55:42+5:30

सोसायटीतील तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सिने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीनेही सोमवारी संबंधित तरुणी व तिच्या कुटुंबीयाविरुद्ध धक्काबुकी व विनयभंग केल्याची तक्रार केली

Nawazuddin's wife also complains against neighbors | नवाजुद्दीनच्या पत्नीचीही शेजाऱ्यांविरुद्ध तक्रार

नवाजुद्दीनच्या पत्नीचीही शेजाऱ्यांविरुद्ध तक्रार

मुंबई : सोसायटीतील तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सिने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीनेही सोमवारी संबंधित तरुणी व तिच्या कुटुंबीयाविरुद्ध धक्काबुकी व विनयभंग केल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे वर्सोवा पोलीस बुचकळ्यात पडले असून, सीसीटीव्ही फूटेज आणि रहिवाशांच्या जबाबानंतर सत्य स्पष्ट होणार आहे. दरम्यान, दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Web Title: Nawazuddin's wife also complains against neighbors