Nawab Malik : देवेंद्र फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत नवाब मलिक काय गौप्यस्फोट करणार? आजच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 08:59 AM2021-11-10T08:59:16+5:302021-11-10T09:00:13+5:30

Nawab Malik : देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देत आता नवाब मलिक पुन्हा एकदा माध्यमांसमोर येणार आहेत.

Nawab Malik: What will Nawab Malik do about the underworld connection of Devendra Fadnavis? Attention to today's press conference | Nawab Malik : देवेंद्र फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत नवाब मलिक काय गौप्यस्फोट करणार? आजच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष

Nawab Malik : देवेंद्र फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत नवाब मलिक काय गौप्यस्फोट करणार? आजच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष

googlenewsNext

मुंबई : राज्यात आर्यन खान आणि मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काल भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त 20 लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यानंतर नवाब मलिकांनीही पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. 

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देत आता नवाब मलिक पुन्हा एकदा माध्यमांसमोर येणार आहेत. आज सकाळी 10 वाजता नवाब मलिक पत्रकार परिषद घेणार आहेत. यासंदर्भात नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे. "त्यांची झोप उडाली आहे, आता शांतता गमावण्याची वेळ आली आहे, भेटुया आज  सकाळी 10 वाजता", असे ट्विट करत नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 

दरम्यान, मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर नवाब मलिक यांनी म्हटले होते की, उद्या सकाळी देवेंद्र फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी असलेले नाते उघड करणार आहे. तसेच, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डच्या साथीने राज्य वेठीस धरले होते, असेही नवाब मलिकांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस माझे नाव खराब करण्याचे काम करत आहेत. मागेही पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी माझ्या जावयाच्या घरात गांजा सापडला होता. याप्रकरणी माझी मुलगी तुम्हाला नोटीस पाठवत आहे, असेही नवाब मलिकांनी सांगितले होते. त्यामुळे नवाब मलिक आज नेमका काय गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

नवाब मलिकांचे अंडर्वल्डशी संबंध - देवेंद्र फडणवीस 
देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त 20 लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच, सलीम पटेल कोण होता, त्यानं तुम्हाला इतक्या स्वस्तात जमीन का विकली? असे सवाल देखील नवाब मलिक यांना केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबीयांशी संबंध असल्याचा घणाघात केला. नवाब मलिक यांच्या मुलाचे थेट संबंध दाऊद इब्राहिमसोबत असल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत केला.

Web Title: Nawab Malik: What will Nawab Malik do about the underworld connection of Devendra Fadnavis? Attention to today's press conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.