शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारवर आरोप करण्यापूर्वी IAS, IPS अधिकारी फडणवीसांना भेटतात; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 15:12 IST

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते फडणवीस आणि केंद्रातील काही मंत्र्यासोबत बैठका झाल्यानंतरच आरोपांची सुरूवात झाली आहे. विरोधकांना बदनाम करण्यासाठी आणि अडचणीत आणण्यासाठी हे ठरवून कटकारस्थान केले जात आहे.

मुंबई - राज्य सरकारवर आरोप करण्यापूर्वी काही आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बैठका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाल्या होत्या. भाजपकडून हे कटकारस्थान ठरवून केले जात आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. एवढेच नाही तर, वेळ आली की, आरोप करण्यापूर्वी कोण-कोणते आयपीएस अधिकारी आणि विरोधीपक्ष नेते कुठे आणि कसे भेटले, याचीही माहिती देऊ, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या या आरोपामुळे, राज्यातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीनंतरच आरोपांना सुरुवात -माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते फडणवीस आणि केंद्रातील काही मंत्र्यासोबत बैठका झाल्यानंतरच आरोपांची सुरूवात झाली आहे. विरोधकांना बदनाम करण्यासाठी आणि अडचणीत आणण्यासाठी हे ठरवून कटकारस्थान केले जात आहे. हा नियोजित कार्यक्रम आहे. या देशातील संस्थांचा राजकीय वापर होत असल्याचेही आता लपून राहिले नाही. ईडी असो अथवा सीबीआय, यांच्या कार्यपद्धतीवर सर्वोच्च न्यायालयानेही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे आम्हाला बदनाम करण्यासाठी जेवढ्या ताकतीने प्रयत्न करतील, त्यांना जनता निश्चितपणे उत्तर देईल, असेही मलिक म्हणाले.

ठरवून कटकारस्थान -केंद्रातील भाजप सरकार जेथे-जेथे विरोधी पक्षाची सरकार आहे. तेथे-तेथे त्या सरकारांना बदनाम करण्यासाठी, त्यांच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी कट कारस्थान रचत आहे. बंगालमध्ये अशीच परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही तसेच सुरू आहे. अनिल देशमुख, भावना गवळी, संजय राऊत, अनिल परब यांनाही राजकीय हेतूने टार्गेट केले जात आहे. कुणी अधिकारी भ्रष्ट असतील तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण ज्या पद्धतीने सर्व विषय राजकीय हेतूने जोडण्यात येत आहेत. हे सर्व भाजपचे कटकारस्थान आहे, असा आरोपही मलिक यांनी केला.

मलिक यांच्या आरोपात तथ्य नाही - भाजपयासंदर्भात बोलताना, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मलिक यांचा आरोप फेटाळून लावत देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीत कामानिमित्त अधिकारी माजी मुख्यमंत्री अथवा विरोधी पक्षनेत्यांना भेटूत शकतात. त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढणे योग्य नाही, असे म्हटले आहे.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस