शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sana Malik : अर्धसत्य हे पूर्ण खोटं असतं! नवाब मलिकांच्या लेकीचं फडणवीसांना प्रत्युत्तर; 'तो' फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 20:22 IST

Sana Malik And Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

मुंबई – विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दुसरा पेन ड्राइव्ह सादर करत महाविकास आघाडी सरकारला दुसरा हादरा दिला आहे. मंत्री नवाब मलिकांवर (Nawab Malik) निशाणा साधत दाऊदची माणसं वक्फ बोर्डावर नियुक्ती केल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. वक्फ बोर्डात कसे पैसे कमवायचे याबाबतचा संवाद असलेला पेन ड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला. वक्फ बोर्डाचे डॉ. मुद्दशीर लांबे आणि अर्शद खानशी संवाद झाला. या संवादात अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा उल्लेख करण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं. फडणवीस यांच्या आरोपांवर नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक (Sana Malik) यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

सना मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. मुदस्सीर लांबे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच मुदस्सीर लांबे हे वक्फ बोर्डात कधी दाखल झाले याची तारीख समोर आणली आहे. "अर्धसत्य हे पूर्ण खोटं असतं. डॉ. लांबे यांची नियुक्ती देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाच्या सरकारच्या काळात झाली होती" असं म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकार नोव्हेंबर 2019 मध्ये आलं होतं. माझ्या वडिलांकडे अल्पसंख्यांक आणि वक्फ विभाग जानेवारी 2020 मध्ये आले आहेत. देवेंद्र फडणवीस हे डी गँगच्या नातेवाईकांच्या आणि बलात्काराचा आरोप असणाऱ्या व्यक्तीसोबत असल्याचा दावा सना मलिक केला. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अल्पसंख्याक विभागाशी लोकांचा दाऊदशी संबंध आला तरच त्यांना काम द्यायचं असं सरकारचा काही आहे का?, पोलिसांच्या बदल्या रॅकेट, महाकत्तलखानानंतर आज दिलेल्या पेनड्राईव्हमध्ये दोन पात्रं आहेत. एक मोहम्मद अर्शद खान आणि दुसरे डॉ. मुद्दशीर लांबे. डॉ लांबे यांना अल्पसंख्याक विभागाने वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नेमलं आहे. ३१ डिसेंबर २०२० मध्ये लांबे यांच्याविरोधात एका ३३ वर्षीय महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली. त्या तक्रारीत लग्नाच्या आमीष दाखवून बलात्कार केल्याचं म्हटलं आहे. या महिलेने आत्महत्या करण्याचा इशारा दिला तरीही लांबे यांच्यावर कारवाई केली नाही. २८ जानेवारी २०२२ ला लांबे यांनी महिलेच्या पतीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असं त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक ‘पेन ड्राइव्ह बॉम्ब’

या संवादात डॉ. लांबे म्हणतात की, माझे सासरे दाऊदचे राइट हँड होते, माझं लग्न हसीना आपा, इक्बाल कासकर पत्नी यांच्या मध्यस्थीने केले होते. त्यामुळे जरा काही झाले तर वरपर्यंत प्रकरण पोहचते. माझे सासरे संपूर्ण कोकण सांभाळायचे. मुंबईत माझे काका होतो. मी मदनपुरात होतो. माझ्या घरात काही झालं तर थेट भाईपर्यंत वाद पोहचतो. आपल्याकडे पाहिजे तेवढा पैसा आहे. वक्फचं काम करा. जे काही होईल त्यात तुझे अर्धे आणि माझे अर्धे असा उल्लेख आहे. ज्या फोनवरून अर्शद खानसोबत संवाद झाला ते मी सभागृहात दिलं आहे. अर्शद खान हा ठाण्याच्या जेलमध्ये आहे. त्याचा मोबाईल पोलिसांकडे आहे तो तात्काळ ताब्यात घ्यावा. चक्क दाऊदची माणसं वक्फ बोर्डावर नियुक्ती केलीत का? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात विचारला.

दरम्यान, अर्थसंकल्पावर बोलत असताना एकीकडे ४ गोष्टी सरकार कमी करेल, एकीकडे वाढवेल, विकास कमी जास्त होईल. ते चालण्यासारखं आहे. परंतु दाऊदसोबत ज्यांचे संबंध आहेत अशा लोकांना महाराष्ट्र सरकार पाठिशी घालत असेल तर या राज्याचे कुणीच भलं करू शकत नाही. त्यामुळे आता तरी सरकारने जागे व्हावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnawab malikनवाब मलिकBJPभाजपाPoliticsराजकारण