शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

डोक्यावर तुळस, मुखी विठूनामाचा गजर; राणा दाम्पत्याचा वारीत सहभाग, पांडुरंगाचरणी नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 11:45 IST

Navneet Rana And Ravi Rana In Ashadhi Wari: रवी राणा यांनी वारकऱ्यांच्या पेहराव केला होता. नवनीत राणा यांनी डोक्यावर तुळस ठेवून पायी वारी केली. तसेच महायुतीचे सरकार पुन्हा यावे, यासाठी विठूरायाला साकडे घातले.

Navneet Rana And Ravi Rana In Ashadhi Wari: अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी आली आहे. राज्यभरातून निघालेल्या संतांच्या पालख्या आणि लाखो वारकरी पंढरपूरच्या मार्गावर आहेत. विठ्ठलाच्या दर्शनाची आस वारकऱ्यांना लागली आहे. राज्याभरात कोसळत असलेल्या भर पावसातही न दमता, उसंत न घेता वारकरी पायी वारी करत आहेत. वारकऱ्यांचा उत्साह दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यातच आता माजी खासदार नवनीत राणा आणि विद्यमान आमदार रवी राणा या दाम्पत्याने वारीत सहभागी झाल्यानंतर पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतले. 

पाऊले चालती पंढरीची वाट, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल चरणी नतमस्तक झाले. डोक्यावर तुळस घेऊन फुगडीचा फेर धरत पंढरीच्या वारीत सहभाग घेतला. महाराष्ट्रासह अमरावती जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योजक, कष्टकरी, श्रमजीवी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्या सुख, समृद्धी तसेच शांतीसाठी श्री पांडुरंगाला साकडे घातले, अशी माहिती नवनीत राणा यांनी एक्सवर पोस्ट करत दिली. 

वारीतील महिलांबरोबर फुगडीही खेळली

आमदार रवी राणा वारकऱ्यांच्या पेहराव्यात दिसले. तर, नवनीत राणा यांनी डोक्यावर तुळस ठेवून पायी वारी केली. तसेच नवीनत राणा यांनी वारीतील महिलांबरोबर फुगडी खेळली. त्यानंतर राणा दाम्प्त्यानेही एकमेकांबरोबर फुगडी खेळली, अशी माहिती देण्यात आली आहे. शेतकरी, शेतमजूर भगिनींसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप कामे केली आहेत. या कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनत महायुतीला आशीर्वाद देईल, असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला. तसेच लोकसभा निवडणुकीच्या काळात खोटा प्रचार केला गेला. खोटे जास्त दिवस चालत नाही. सत्य हे सत्य असते. येणाऱ्या भविष्यात खोट्याचा प्रचार करणाऱ्यांना धडा नक्की शिकवणार आहे, असे राणा यांनी सांगितले.

दरम्यान, महायुतीचे सरकार येण्यासाठी माऊलीच्या दर्शनाला आम्ही आलो आहे. महायुतीचे सरकार पुन्हा बसावे म्हणून आम्ही साकडे घातले. जेव्हा निवडणूक लढले, तेव्हा स्वतःच्या विश्वासावर निवडणूक लढले. त्यामुळे माझा पराभव झाला. खूप संघर्ष आणि मेहनत घेतली होती. परंतु, कुठेतरी कमतरता राहिली असेल त्यामुळे पराभव झाला. मी भाजपा कार्यकर्ता आहे, रवी राणा हे महायुतीचे घटकपक्ष म्हणून गेल्या १० वर्षांपासून मोदींबरोबर आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणार आहे, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाRavi Ranaरवि राणाAshadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Pandharpurपंढरपूर