स्वच्छ भारत अभियानावर नवी मुंबईची मोहर,15 वर्षात स्वच्छतेचा चौथा पुरस्कार

By Admin | Updated: May 4, 2017 20:53 IST2017-05-04T20:53:55+5:302017-05-04T20:53:55+5:30

स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबई महापालिकेला महाराष्ट्रात प्रथम व देशात 8 व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे.

Navi Mumbai stamp on Swachh Bharat Abhiyan, fourth consecutive award for cleanliness in 15 years | स्वच्छ भारत अभियानावर नवी मुंबईची मोहर,15 वर्षात स्वच्छतेचा चौथा पुरस्कार

स्वच्छ भारत अभियानावर नवी मुंबईची मोहर,15 वर्षात स्वच्छतेचा चौथा पुरस्कार

>ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 4 - स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबई महापालिकेला महाराष्ट्रात प्रथम व देशात 8 व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 2002 पासून नवी मुंबई महापालिकेने स्वच्छतेविषयी मिळविलेला सलग चौथा पुरस्कार असून पाणी, घनकचरासह विविध क्षेत्रतील एकूण 14 महत्त्वाचे पुरस्कार मिळविले आहेत. 
 
दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये महापौर सुधाकर सोनावणो व आयुक्त रामास्वामी एन. यांनी हा पुरस्कार  स्वीकारला. महापालिकेची स्थापना झाल्यापासून नेहमीच स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले आहे. 2002, 2003 व 2005 मध्ये सलग तीन वेळा राज्य शासनाचे पुरस्कार मिळविल्यानंतर शासन निर्देशानुसार केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग घेतला होता. शहरात केलेल्या सव्रेक्षणाप्रमाणो 3398 कुटुंबे उघडय़ावर शौचास बसत असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे 1935 घरगुती शौचालये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ज्या ठिकाणी वैयक्तिक शौचालय बांधणो शक्य नाही अशा ठिकाणी 69 सामुदायिक शौचालये उभारून 719 सीट्स उपलब्ध करून देण्यात आल्या. शहरात विविध ठिकाणी 369 सामुदायिक शौचालये व 137 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यामध्ये 5567 सीट्स उपलब्ध आहेत. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ऑक्टोबर  2014 ते जानेवारी 2017 या कालावधीमध्ये 93 सामुदायिक शौचालये, 20 ई टॉयलेट्स व महिलांसाठी 6 स्मार्ट एसएचई टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आली. बेलापूरमधील रमाबाई आंबेडकरनगर मध्ये 53, ऐरोलीतील समता नगर, ऐरोली नाका, साईनाथवाडी व गणपती कॉलनी येथे 312 अशी एकूण 365 वैयक्तिक घरगुती शौचालये बांधण्यात आली. 
 
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत  2015 - 16  मध्ये  65 स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या व 3 लाख 25 हजार 55 मनुष्यतास श्रमदान करण्यात आले. 2016 - 17 या वर्षामध्ये 170 विशेष मोहिमांचे आयोजन करून लोकसहभागाच्या माध्यमातून 1 लाख 65 हजार 781 मनुष्यतास श्रमदान करण्यात आले. स्वच्छतेबरोबर प्लास्टिकमुक्त नवी मुंबई संकल्पना राबविण्यात आली. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर प्रतिबंध आणण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्लास्टिकवर प्रक्रिया करून प्लास्टिक अॅग्लो तयार करण्यात आला. त्याचा वापर करून एमआयडीसीतील 10 रस्ते तयार करण्यात आले आहेत.
 
 कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी शहरातील 700 पैकी 200 ठिकाणच्या कम्युनिटी बिन्स काढण्यात आल्या आहेत. शहरातील 13,500 कचराकुंडय़ा व 600 कम्युनिटी बिन्समधील कचरा प्रत्यक्षात उचलण्यात आला की नाही याविषयी सर्व वाहनांना जीपीएस व जीपीआरएस प्रणाली बसविण्यात आली असून त्याद्वारे नियंत्रण करण्यात येत आहे. महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे प्रशासनाला स्वच्छ भारत अभियानामध्ये यश आले आहे. 
 
 
प्रतिक्रिया 
हा पुरस्कार नवी मुंबईकरांना समर्पित करत आहे. सफाई कामगार, प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी घेतलेल्या परिश्रमामुळे यश आले असून भविष्यात अजून चांगले काम करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. 
- सुधाकर सोनावणो,
महापौर, नवी मुंबई 
 
प्रतिक्रिया 
 
नवी मुंबईला देशातील 8 वे व राज्यातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर असल्याचे मानांकन मिळाले आहे. हा बहुमान लोकप्रतिनिधी, प्रशासन व सर्व नागरिकांचा आहे. भविष्यात पालिकेचे मानांकन सतत उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील. 
- रामास्वामी एन.,
आयुक्त, नवी मुंबई महापालिका 
 
देशातील आदर्श प्रकल्प नवी मुंबईत
स्वच्छतेविषयी राज्यातील प्रथम क्रमांक मिळालेल्या नवी मुंबईमध्ये देशातील सर्वात आदर्श डम्पिंग ग्राउंड आहे. शास्त्रोक्त पद्धतीने घनकच:याची विल्हेवाट लावली जात आहे. शहरातील 100 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असून देशातील सर्वात अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र पालिकेने उभारलेली आहेत. कचरा उचलण्यापासून ते त्यांची विल्हेवाट लावण्यार्पयत अत्यंत चांगली यंत्रणा असल्याने पालिकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

Web Title: Navi Mumbai stamp on Swachh Bharat Abhiyan, fourth consecutive award for cleanliness in 15 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.