शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
2
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
3
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
4
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
5
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
6
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
7
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
8
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
9
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
10
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
11
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
13
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
14
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
15
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
16
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
17
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
18
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
19
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
20
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट

नवी मुंबई सर्वच महामार्ग ठप्प  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 05:17 IST

बंदला नवी मुंबईतूनही योग्य प्रतिसाद मिळाला. सायन-पनवेल तसेच ठाणे-बेलापूर मार्गावर ठिकठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी रेल रोको करून भीमसैनिकांनी निषेध नोंदवला. याामुळे मुंबई-पुणे महामार्गासह शहरातील सर्वच महत्त्वाचे मार्ग ठप्प झाले होते.

नवी मुंबई - बंदला नवी मुंबईतूनही योग्य प्रतिसाद मिळाला. सायन-पनवेल तसेच ठाणे-बेलापूर मार्गावर ठिकठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी रेल रोको करून भीमसैनिकांनी निषेध नोंदवला. याामुळे मुंबई-पुणे महामार्गासह शहरातील सर्वच महत्त्वाचे मार्ग ठप्प झाले होते.बंदमध्ये दुकानदार, व्यापारी, यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. दिघा येथील भीमसैनिकांनी सकाळी ९ वाजताच ठाणे-बेलापूर मार्ग अडवला. मोठ्या प्रमाणात महिला-पुरुषांसह तरुणांचा जमाव रस्त्यावर उतरला. त्यानंतर तुर्भे, सीबीडी, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, कळंबोली या ठिकाणी रास्ता रोको झाल्याने मुंबई-पुणे महामार्गासह शहरातील सर्वच महत्त्वाचे मार्ग ठप्प झाले होते. अनेकांनी घराबाहेर पडण्याचे टाळल्याने रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. तर दोन ठिकाणी एनएमएमटीच्या बस फोडल्याचे प्रकार घडल्याने दुपारी २नंतर एनएमएमटीच्या बस बंद करण्यात आल्या होता. रबाळे, तुर्भे या ठिकाणी रेल रोको करून आंदोलन केले. तुर्भे येथे काहींनी रेल्वेवर दगडफेक केली. तर रबाळे येथे सुमारे ४० मिनिटे दोन्ही मार्गांच्या रेल्वे अडवण्यात आल्या. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांनी रेल्वेमार्ग मोकळा केला. अनेक ठिकाणी रिक्षाचालकांनी बंदमध्ये सहभाग घेतला. जमाव आक्रमक असल्याने आंदोलनाला गालबोट लागू नये, याकरिता शहरात सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक व शहर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.बाजार समितीमध्ये सौम्य लाठीमारआंदोलकांनी मसाला मार्केट बंद करण्याचा प्रयत्न केला. मार्केटमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पोलीस, माथाडी नेते व आरपीआयच्या नेत्यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केल्यानंतर सर्व परिस्थिती नियंत्रणामध्ये आली.पण या बंदमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहारावरही परिणाम झाला. धान्य, भाजीपाला, फळ, मसाला व कांदा-बटाटा मार्केटमध्ये एकूण १३६४ वाहनांची आवक झाली. यापैकी फक्त ४३७ वाहनांमधून माल मुंबई व नवी मुंबईमध्ये विक्रीसाठी गेला. मध्यरात्री भाजीपाल्याच्या ५७७ वाहनांची आवक झाली. त्यापैकी ३१६ वाहनांमधून माल मुंबई, नवी मुंबईमध्ये विक्रीला गेला.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदBhima-koregaonभीमा-कोरेगाव