शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात राष्ट्रवादी बेघर

By admin | Updated: June 4, 2015 00:44 IST

पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वत:च्या मालकीचे कोल्हापुरात कार्यालय नाही.

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्यालय असलेली शिवाजी स्टेडियममधील जागा खाली करण्यास सांगण्यात आल्यामुळे पक्षाला नवीन कार्यालयाचा शोध घेण्याची वेळ आली आहे. शहर कार्यालयात झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी केलेल्या भाषणातून ही माहिती स्पष्ट झाली. गेल्या पंधरा वर्षांपासून शहर राष्ट्रवादीचे कार्यालय शिवाजी स्टेडियममधील एका गाळ्यात असून हा गाळा बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील यांच्या मालकीचा आहे, तर जिल्हा कार्यालय ताराबाई पार्क येथील एका इमारतीच्या तळमजल्यावर असून ती जागा संगीता खाडे यांच्या मालकीची आहे. मुळात जिल्हा कार्यालयही पार्किंगच्या जागेतच वसलेले आहे. पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वत:च्या मालकीचे कोल्हापुरात कार्यालय नाही. बुधवारी शहर कार्यालयात झालेल्या सत्कार समारंभात किसन कल्याणकर यांनी कार्यालयाच्या इमारतीचा प्रश्न उपस्थित केला. पक्षाने स्वत:च्या जागेत कार्यालय सुरू करावे, अशी सूचना त्यांनी केली. त्याचा संदर्भ देत आर. के. पोवार यांनी शहर आणि जिल्हा कार्यालय एकत्र सुरू करण्यासाठी रेल्वे फाटक क्रमांक २ (टेंबलाई फाटक)जवळ जागा पाहिली आहे. बांधकाम खर्च पक्षाने करावा, अशी आमची भूमिका आहे परंतु त्यातून अद्याप मार्ग निघालेला नाही. शहर कार्यालयाची जागा सोडण्याबाबत मालकांनी विनंती केली असल्याने पक्षाला स्वत:चे कार्यालय उभारावे लागणार असल्याचे पोवार यांनी सांगितले. शहर कार्यालयाचे चाळीस हजार रुपये वीजबिल थकले होते, मूळ मालकांनी हात वर केले. मी तुम्हाला गाळा दिलाय आता वीज आणि फाळा तुम्ही भरा, असे सांगून त्यांनी आपली बाजू काढून घेतली. त्यामुळे थकलेल्या वीज बिलासाठीही पक्षाला दुसऱ्याकडे हात पसरावे लागले होते. (प्रतिनिधी)शिवाजी स्टेडियमधील शहर कार्यालयाची जागा खाली करण्याची सूचनाजिल्हा कार्यालयही ताराबाई पार्कात पार्किंगच्या जागेतगेल्या पंधरा वर्षांपासून मालकीचे कार्यालय नाहीशहर व जिल्हा कार्यालयासाठी रेल्वेच्या टेंबलाई फाटकाजवळ जागेची पाहणी