राष्ट्रसेविका समितीची काँग्रेसवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2016 21:23 IST2016-07-30T21:23:04+5:302016-07-30T21:23:04+5:30
काँग्रेस पक्षाचे नेते राजकीय पातळीवर निराश झाले आहेत व याच वैफल्यातून ते आरोप करत आहेत अशी टीका राष्ट्रसेविका समितीतर्फे करण्यात आली आहे

राष्ट्रसेविका समितीची काँग्रेसवर टीका
>ऑनलाइन लोकमत -
नागपूर, दि. 30 - राष्ट्रसेविका समितीतर्फे काँग्रेस पक्षावर जोरदार टीका करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राजकीय पातळीवर निराश झाले आहेत व याच वैफल्यातून ते राष्ट्रसेविका समितीवर पातळी सोडून आरोप करत आहेत, असे समितीतर्फे म्हणण्यात आले आहे. राष्ट्रसेविका समितीत मुलींची तस्करी होते, असे वक्तव्य काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी व शोभा ओझा यांनी एका साप्ताहिकास दिले होते, असा दावा समितीतर्फे करण्यात आला आहे.
राष्ट्रसेविका समितीतर्फे गेल्या ८० वर्षांपासून नि:स्वार्थपणे काम करण्यात येत आहे. समितीच्या सर्व वसतीगृहांत नियमांनुसार काम चालते. काँग्रेसच्या नेत्यांकडून झालेले सर्व आरोप तथ्यहीन आहेत. जर संबंधित नेत्यांनी जाहीर माफी मागितली नाही, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा समितीच्या मुख्य कार्यवाहिका अन्नदानम् सीता यांनी दिला आहे.