National Inter-Religious Conference: आम्हालाही चांगले रस्ते हवेत; लडाखच्या भिक्खू संघसेनांची नितीन गडकरींकडे मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 02:08 PM2021-10-24T14:08:44+5:302021-10-24T14:09:40+5:30

Bhikkhu SanghSena demand from Nitin Gadkari: भारताची संपत्ती ही पेप्सी, कोकाकोला नाहीय, तर योग, मेडिटेशन ही आहे. जग भारताकडे डोळे लावून आहे. भारतच जगाला संकटांपासून वाचवू शकतो, असे त्यांना वाटत आहे, असे भिक्खू संघसेना म्हणाले.

National Inter-Religious Conference: Bhikkhu SanghSena of Ladakh demand for better roads from Nitin Gadkari | National Inter-Religious Conference: आम्हालाही चांगले रस्ते हवेत; लडाखच्या भिक्खू संघसेनांची नितीन गडकरींकडे मोठी मागणी

National Inter-Religious Conference: आम्हालाही चांगले रस्ते हवेत; लडाखच्या भिक्खू संघसेनांची नितीन गडकरींकडे मोठी मागणी

Next

लोकमत आधीपासूनच शांतता आणि ऐक्यावर विश्वास ठेवतो. तो यापुढेही कायम ठेवावा. जगभरातील शांततेबाबत मी अधिक काही सांगत नाही, तुम्हा सर्वांना याची माहिती आहे. जगात या आधी काय काय घडले ते साऱ्यांनी पाहिले आहे. जग भारताकडे आशेने डोळे लावून आहे. भारतच जगाला संकटांपासून वाचवू शकतो, असे त्यांना वाटतेय असे महाबोधी आंतरराष्ट्रीय ध्यानसाधना केंद्र, लडाखचे संस्थापक भिक्खू संघसेना (Bhikkhu Sanghasena) यांनी म्हटले.

‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आज नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘धार्मिक सौहार्दाबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर या परिषदेमध्ये विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत महामंथन होत आहे. या परिषदेच्या माध्यमातून जगभरात धार्मिक सद‌्भावनेचा संदेश जाणार आहे. ( Lokmat National Inter-Religious Conference in Nagpur)

भारत हा शांतताप्रिय देश आहे. भारत हा जगाचा विश्वगुरु आहे. भारताची संपत्ती ही पेप्सी, कोकाकोला नाहीय, तर योग, मेडिटेशन ही आहे. जग भारताकडे डोळे लावून आहे. भारतच जगाला संकटांपासून वाचवू शकतो, असे त्यांना वाटत आहे. थिंग थ्रू द हेड, फिल थ्रू द हार्ट, अॅक्ट थ्रू द हँड हा थ्री एच मंत्र आहे, असे भिक्खू संघसेना यांनी सांगितले.  

भारताला सर्वात मोठे शांततेचे पुरस्कर्ते लाभले. ही भूमी भगवान राम, भगवान कृष्ण, भगवान महावीर, महात्मा गांधी, गौतम बुद्ध यांची आहे. या लोकांनी जगात भारताचे महत्व, शांतता पसरविली आहे. फक्त यांत्रिक, तांत्रिक विकास गरजेचा नाही. मी लडाखहून येतो, नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांतून नवीन लडाख आता बदलत आहे. लडाखमधील रस्ते बदलत आहेत. नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) त्यासाठी काम केले आहे. आमच्या कॅम्पमध्ये देखील रस्ते चांगले नाहीत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र आहे. त्यामुळे तेथे परदेशातून देखील लोक येतात. आम्हाला तिथे चांगले रस्ते हवेत, अशी मागणी त्यांनी गडकरींकडे केली.  तसेच लडाखला यावे, असे निमंत्रणही त्यांनी गडकरी, श्री श्री श्री रवीशंकर यांना दिले.
 

Web Title: National Inter-Religious Conference: Bhikkhu SanghSena of Ladakh demand for better roads from Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app