शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये झोक्याच्या दोरीचा फास बसून दहा वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 21:47 IST

नाशिक : घरात मुलींसोबत झोका खेळत असताना अचानक दोरी तुटून त्याचा फास बसल्याने दहा वर्षीय मुलीचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़११) दुपारी चुंचाळे शिवारात घडली़ तितीक्षा किरण राऊळ (रा. रो हाऊस नंबर ५७३, जाधव टाऊनशीप, चुंचाळे शिवार, नाशिक) असे दुर्दैवी मुलीचे नाव आहे़ या घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

ठळक मुद्देचुुंचाळे शिवारातील घटना : अचानक तुटली दोरी

नाशिक : घरात मुलींसोबत झोका खेळत असताना अचानक दोरी तुटून त्याचा फास बसल्याने दहा वर्षीय मुलीचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़११) दुपारी चुंचाळे शिवारात घडली़ तितीक्षा किरण राऊळ (रा. रो हाऊस नंबर ५७३, जाधव टाऊनशीप, चुंचाळे शिवार, नाशिक) असे दुर्दैवी मुलीचे नाव आहे़ या घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरातील बेडरूममध्ये बांधलेल्या झोक्यावर तितीक्षासह आणखी दोन मुली झोका खेळत होत्या़ दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास झोक्याचा एक दोर तुटला व त्याचा फास तितीक्षाच्या गळ्याभोवती बसला़ ही बाब लक्षात येताच तिचे वडील किरण राऊळ यांनी तिला उपचारासाठी प्रथम घराजवळील खासगी रुग्णालय व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉग़ायधनी यांनी तपासून मयत घोषीत केले़

पोलीस आयुक्तालयातील प्रशासन विभागात लिपीक म्हणून कार्यरत असलेले किरण राऊळ यांची तितिक्षा ही मुलगी आहे़ या घटनेमुळे जाधव टाऊनशिप परिसरात हळहळ व्यक्त केली आहे़ दरम्यान, दोन आठवड्यांपुर्वीच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील आदिवासी पाड्यातील बारा वर्षीय मुलीचा झोका खेळत असताना गळफास बसून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती़पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे सिडको परिसरात यापुर्वी एका लहान मुलाच्या घशात खेळण्यातील रबरचा फुगा अडकल्याने तर नाशिकरोड परिसरात दहा रुपयांचा कॉईन घशात अडकल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे़ लहान मुले घरात खेळत असताना पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़- मधुकर कड, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसDeathमृत्यू