शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शॉवरमध्ये विद्युतप्रवाह उतरल्याने नाशिकमध्ये डॉक्टरचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 21:45 IST

नाशिक : बाथरूममध्ये शॉवरने आंघोळ करीत असताना अचानक शॉवरमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे एका तरुण डॉक्टरचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़१५) गंगापूररोड परिसरातील कुसुमाग्रज स्मारकाजवळ घडली. डॉ़ आशिष विलास काकडे (२४, रा. इंद्रप्रस्थ अपार्टमेंट, लोटस हॉस्पिटलशेजारी, गंगापूररोड) असे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

ठळक मुद्देशॉवरमध्ये विद्युत प्रवाह ; कुसुमाग्रज स्मारकाजवळ घटना सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

नाशिक : बाथरूममध्ये शॉवरने आंघोळ करीत असताना अचानक शॉवरमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे एका तरुण डॉक्टरचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़१५) गंगापूररोड परिसरातील कुसुमाग्रज स्मारकाजवळ घडली. डॉ़ आशिष विलास काकडे (२४, रा. इंद्रप्रस्थ अपार्टमेंट, लोटस हॉस्पिटलशेजारी, गंगापूररोड) असे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास इंद्रप्रस्थ अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी खाली येत असल्याने रहिवाशांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता संपूर्ण घरात पाणी साचले होते. अपार्टमेंटमधील रहिवाशांनी बाथरूममध्ये जाऊन बघितले असता डॉ. आशिष काकडे हे अर्धनग्न अवस्थेत बाथरूममध्ये पडलेले होते़ रहिवाशांनी तत्काळ विद्युत पुरवठा बंद करून पोलिसांना माहिती दिली़या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते़ डॉ़ काकडे यांच्या अंगावर ठिकठिकाणी विद्युत प्रवाहाने भाजल्याच्या खुना होत्या़ बाथरूममधील शॉवर व नळांमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने डॉ़ काकडे यांचा मृत्यू झाल्याची नोंद सरकारवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. डॉ. काकडे यांचा मृत्यू पहाटे आंघोळ करताना झाला असण्याची शक्यता वर्तवली जात असून, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले़ दरम्यान, मयत डॉ़ आशिष काकडे यांचे आई-वडीलही डॉक्टर असून ते नोकरीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे राहतात़

टॅग्स :Nashikनाशिकdoctorडॉक्टरDeathमृत्यूPoliceपोलिस