शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

पोलीस उपनिरीक्षकाला बलात्कार प्रकरणी सात वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 6:08 PM

नाशिक : विवाहाचे अमिष दाखवून चार वर्षे प्रेमसंबंध ठेवून विविध ठिकाणी नेऊन शारीरीक अत्याचार करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी मंगळवारी (दि़२६) बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ पंकज सुरेश काटे (रा़ पंडीतनगर, मोरवाडी, सिडको, नाशिक)असे शिक्षा झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात तो कर्तव्यावर आहे़ जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील रविंद्र निकम यांनी पाच साक्षीदार तपासून आरोप सिद्ध केले़

ठळक मुद्दे जिल्हा व सत्र न्यायालय : २०१२ मध्ये गुन्हा दाखल पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर

नाशिक : विवाहाचे अमिष दाखवून चार वर्षे प्रेमसंबंध ठेवून विविध ठिकाणी नेऊन शारीरीक अत्याचार करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी मंगळवारी (दि़२६) बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ पंकज सुरेश काटे (रा़ पंडीतनगर, मोरवाडी, सिडको, नाशिक)असे शिक्षा झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात तो कर्तव्यावर आहे़ जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील रविंद्र निकम यांनी पाच साक्षीदार तपासून आरोप सिद्ध केले़

नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाचे प्रशिक्षण सुरू असताना आजारी पडल्याने पंकज काटे हा शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होेते़ या ठिकाणी काम करीत असलेल्या नर्ससोबत काटे याचे प्रेमसंबंध निर्माण झाले़ या युवतीस विवाहाचे अमिष दाखवून २००७ ते २०११ या कालावधीत नाशिक, पुणे अशा विविध ठिकाणी नेऊन उपनिरीक्षक काटे याने शारीरिक अत्याचार केले़ मात्र, पोलीस उपनिरीक्षक झाल्यानंतर आरोपी काटे याने विवाहाचे आश्वासन पाळले नाही तसेच बळजबरीने शारीरीक अत्याचार (बलात्कार) केल्याची फिर्याद पिडीत युवतीने अंबड पोलीस ठाण्यात २०१२ मध्ये दिली होती़

जिल्हा व सत्र न्यायाधीश सूचित्रा घोडके यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त हेमराजसिंह राजपूत (अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर) यांनी केला होता़ तर सरकारी वकील रविंद्र निकम यांनी या खटल्यात मूळ फिर्यादी, तिची नर्स मैत्रिण, हॉटेलचा मॅनेजर, डॉक्टर व राजपूत अशा पाच जणांची साक्ष घेतली़ यामध्ये पिडीतेची मैत्रिण ही फितूर झाली होती़ मात्र, सरकारी वकीलांनी साक्षीदारांचे जबाब तसेच परीस्थितीजन्य पुरावे न्यायालयासमोर मांडून काटे विरोधात सबळ पुरावे सादर केले़

न्यायाधीश घोडके यांनी आरोपी पंकज काटे यास बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षे साधा कारावास, अ‍ॅटॉसिटीच्या गुन्ह्यात पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास तसेच नागरी हक्क संरक्षण अधिनियम कलम (७)अन्वये सहा महिने कारावास व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली़ न्यायालयाने ठोठावलेल्या २५ हजार पाचशे रुपये दंडापैकी २० हजार रुपये पिडीतेला देण्याचे आदेशही देण्यात आले आहे़पुरावे न्यायालयासमोर सादर

पिडीत युवती सज्ञान असून तिच्या संमतीनेच दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले त्यास बलात्कार म्हणता येणार नाही असा बचाव केला़ पिडीत युवती सज्ञान असली तरी विवाहाच्या आश्वासनामुळेच तिने शारीरीक संबंधास संमती दिल्याचा आम्ही युक्तिवाद केला़ तसेच या खटल्यात तिची नर्स असलेली मैत्रिणही फितूर झाली होती़ मात्र, हॉटेल मॅनेजर, डॉक्टर व तपास अधिकारी यांचा जबाब व परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयासमोर सादर केले व त्या आधारे आरोपी दोषी ठरविण्यात आले़- अ‍ॅड़ रविंद्र निकम, सरकारी वकील, जिल्हा न्यायालय़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCourtन्यायालय